mrunmayee deshpande manche shlok chitrapat pradarshan thambavle : मृण्मयी देशपांडेच्या मराठी चित्रपट ‘मनाचे श्लोक’भोवती पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे समर्थ रामदास स्वामी यांच्या अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि काही ठिकाणी आरडाओरडा सुरू झाला. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये चित्रपटाचे शो बंद करावे लागले. या घटनेनंतर दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने मोठा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवले असल्याची घोषणा केली आहे.
‘मनाचे श्लोक’ या नावावरून प्रेक्षकांमध्ये आणि धर्मनिष्ठ मंडळींमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या. समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाशी या चित्रपटाच्या शीर्षकाचा साधर्म्य असल्यामुळे अनेक अनुयायांना अस्वस्थता निर्माण झाली. तसेच, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच, समर्थ सेवा मंडळाच्या वतीने उच्च न्यायालयात प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती मागणी केली होती.
उच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर चित्रपट प्रदर्शनास हिरवाकंदील दिला. त्यामुळे १० ऑक्टोबरला चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला, पण त्यानंतर पुणे, संभाजीनगर आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणी विरोधामुळे शो बंद करावे लागले. या घटनेनंतर मृण्मयी देशपांडेने Instagram वर पोस्ट करून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले असल्याची माहिती दिली.
मृण्मयी देशपांडेने पोस्टमध्ये लिहिले, “मनाचे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचा विचार करता आम्ही हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत. नवीन नावासह हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. प्रेक्षकांची भेट लवकरच घ्यायची आहे!”
या निर्णयामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची सुरुवात थांबली असली तरी प्रेक्षक आणि चित्रपटप्रेमी नवीन नावासह लवकरच चित्रपट पाहू शकतील, असे दिसते. मृण्मयी देशपांडेच्या या निर्णयाने वादग्रस्त शीर्षकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते.
हे पण वाचा वाचा.. मी या इंडस्ट्रीत आलो ते माझ्या वहिनीमुळेच, अभिनेता हार्दिक जोशीच्या डोळ्यांत आलं पाणी
‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या वादग्रस्त शीर्षकामुळे सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे दिसते. आगामी आठवड्यात चित्रपटाच्या नवीन नावासह प्रदर्शन सुरू होईल, अशी माहिती दिग्दर्शिकेकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा.. ‘‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणचा खुलासा; म्हणाला, “एमएस धोनीच्या या गुणांमुळे तो माझा आवडता खेळाडू!”









