ADVERTISEMENT

सासुबाईंनी केलं Mrunal Dusanis चं कौतुक; म्हणाल्या – “ती जशी स्क्रीनवर आहे तशीच खऱ्या आयुष्यातही”

अभिनेत्री Mrunal Dusanis ने गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या मुलाखतीत कुटुंबीयांसोबत खास क्षण शेअर केले. यावेळी सासुबाई आणि पतीने तिच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं असून, मृणालने बाप्पाचे आभारही मानले.
Mrunal Dusanis

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक असलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मृणालने अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे तिला घराघरांत ओळख मिळाली. पण ती फक्त प्रेक्षकांचीच आवडती नसून तिच्या कुटुंबीयांचीही लाडकी सून आहे, हे नुकत्याच झालेल्या एका खास मुलाखतीत दिसून आलं.

गणेशोत्सवानिमित्त Mrunal Dusanis ने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा पती, मुलगी आणि सासुबाई अशा संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती. यावेळी Mrunal Dusanis खऱ्या आयुष्यात सून म्हणून कशी आहे, असा प्रश्न तिच्या सासुबाईंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनापासून तिचं कौतुक करत, “जशी ती मालिकेत दिसते तशीच ती खऱ्या आयुष्यातही आहे. ‘नंदिनी’ची भूमिका ती अप्रतिम करते आणि सुनेच्या रूपातही ती तितकीच उत्तम आहे,” असं सांगितलं.

केवळ सासुबाईच नव्हे, तर पतीनेही Mrunal Dusanis च्या कामाबद्दल आपलं मत मांडलं. त्याला विचारण्यात आलं की, मालिकेतली तिची भूमिका तुलाही आवडते का? त्यावर तो हसत म्हणाला, “नंदिनी पहिल्यापासूनच आवडत होती म्हणूनच लग्न केलं. तिचं काम मी वेळ मिळेल तसं बघतो आणि ती ते छान करते.” या विधानाने उपस्थितांचे हसू पिकलेच.

Mrunal Dusanis च्या मुलीनेही आईबद्दल आपलं प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केलं. छोट्या नुर्वीनं ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचं शीर्षक गीत गाऊन सगळ्यांची मने जिंकली. या छोट्याशा क्षणाने संपूर्ण वातावरण आनंदी झालं.

हे पण वाचा.. १२ वर्षांनंतर Kashmira Kulkarni च्या घरी गणरायाचं आगमन; अभिनेत्रीने उघडला ‘कोकु स्टुडिओ

या मुलाखतीत Mrunal Dusanis ला गणेशोत्सवानिमित्त बाप्पाला ती कोणत्या गोष्टीसाठी धन्यवाद देईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती मनापासून म्हणाली, “मी बाप्पाचे प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानते. खरं तर मी काही मागत नाही, कारण आज माझ्याकडे सगळं काही आहे – सुंदर घर, कुटुंब, मुलगी आणि देवाच्या कृपेनं छान कामदेखील. शिवाय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय, मग अजून काय हवं? त्यामुळे मी फक्त कृतज्ञ आहे.”

अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणारी Mrunal Dusanis कौटुंबिक नातेसंबंधातही तितकीच यशस्वी आहे. तिचं हे कौतुक तिच्या चाहत्यांबरोबरच आता तिच्या कुटुंबाकडूनही ऐकायला मिळालं आहे. तिचं हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि जमिनीवर पाय ठेवून जगण्याची वृत्ती यामुळेच ती प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवून आहे.

हे पण वाचा.. भूमिका साकारताना मजा येत नाही; पण…” ‘लक्ष्मी निवास’ फेम Tanvi Kolte ची मनमोकळी कबुली

Mrunal Dusanis इंस्टाग्राम पोस्ट..