ADVERTISEMENT

१२ वर्षांनंतर Kashmira Kulkarni च्या घरी गणरायाचं आगमन; अभिनेत्रीने उघडला ‘कोकु स्टुडिओ

लोकप्रिय अभिनेत्री Kashmira Kulkarni हिच्या आयुष्यात यंदाचा गणेशोत्सव खास ठरला आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि त्याचसोबत तिने ‘कोकु स्टुडिओ’ सुरू करून नवा प्रवास सुरू केला.
Kashmira Kulkarni

लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मधील रम्या ह्या खलनायकी भूमिकेतून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी (Kashmira Kulkarni) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात तिच्या आयुष्यात दोन मोठ्या घटना घडल्या – तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिच्या घरी गणरायाचं आगमन झालं आणि त्याचसोबत तिने स्वतःचा नवा स्टुडिओ सुरू करत एक नवी दिशा पकडली.

गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी Kashmira Kulkarni ने ‘कोकु स्टुडिओ’चे उद्घाटन केले. या विशेष प्रसंगी तिने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “लहानपणापासून घरात ११ दिवसांचा गणपती असायचा. पण गेल्या १२ वर्षांत ही परंपरा थांबली होती. यंदा बाप्पा पुन्हा घरी आले, त्यामुळे माझ्या भावना अतिशय मिश्र आहेत. त्याच दिवशी स्टुडिओचंही उद्घाटन झालं, म्हणजे बाप्पाच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरू झाला आहे.”

अभिनेत्री Kashmira Kulkarni ने स्टुडिओ सुरू करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं. ‘वामा’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कला दिग्दर्शक रवी कोंडके यांच्याशी झालेल्या चर्चेतून या कल्पनेला सुरुवात झाली. सुरुवातीला क्लाउड किचन सुरू करण्याचा विचार होता, मात्र नंतर फिल्म इंडस्ट्रीतील वाढत्या मागणीमुळे स्टुडिओची कल्पना साकारली. मायक्रो सिरीज, वेब सिरीज, जाहिराती, फोटोशूट आणि चित्रपटांसाठी एका जागी बहुपयोगी सेटअप उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा स्टुडिओ उभारला गेला आहे.

Kashmira Kulkarni ने सांगितले की, फक्त १५ दिवसांत या स्टुडिओचं बांधकाम पूर्ण झालं. रवी कोंडके स्वतः आर्ट डायरेक्टर असल्याने त्यांच्या संकल्पनेतून हे शक्य झालं. “एकाच ठिकाणी विविध प्रकारचे सेटअप असतील, ज्यामुळे निर्मात्यांचा वेळ आणि खर्च वाचेल,” असेही ती म्हणाली.

हे पण वाचा.. भूमिका साकारताना मजा येत नाही; पण…” ‘लक्ष्मी निवास’ फेम Tanvi Kolte ची मनमोकळी कबुली

कोकु’ या नावामागेही एक मनोरंजक कहाणी आहे. हे नाव रवीसरांनी सुचवलं आणि अंकशास्त्रानुसार त्याचा अभ्यास केल्यावर Kashmira Kulkarni ला जपानी भाषेत याचा अर्थ ‘विश्व’ आणि ‘समुद्र’ असा सापडला. याशिवाय या नावात तिच्या भागीदार रवी कोंडके यांचे को आणि स्वतःच्या आडनावातील कु मिळून ‘कोकु’ हे खास नाव तयार झाले.

कलाक्षेत्रात करिअर घडवतानाच उद्योजकतेकडे पाऊल टाकणाऱ्या Kashmira Kulkarni च्या या नव्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. तिच्या घरी आलेल्या गणरायासोबतच नव्या प्रवासाची सुरुवात झाल्यामुळे हा गणेशोत्सव तिच्यासाठी आयुष्यभर अविस्मरणीय ठरणार आहे.

हे पण वाचा.. Atharva Sudame नंतर Danny Pandit च्या रीलची चर्चा; गणेशोत्सवातून दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

Kashmira Kulkarni इंस्टाग्राम पोस्ट..