स्टायलससह सादर झालेला motorola edge 60 stylus पहिलाच मिड-रेंज स्मार्टफोन; जबरदस्त फीचर्स, प्रीमियम डिझाईन आणि दमदार बॅटरीसह केवळ ₹22,999 मध्ये!
Table of Contents
भारतीय स्मार्टफोन बाजारात मोटोरोलाने आपली नवीन डिव्हाईस motorola edge 60 stylus लाँच केली आहे. सध्या स्टायलससह येणारे फोन्स प्रीमियम सेगमेंटमध्ये मोजकेच असताना, कंपनीने अत्यंत आकर्षक किंमतीत हे डिव्हाईस उपलब्ध करून देत मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक नवा पर्याय खुला केला आहे. कंपनीने याआधी Edge 60 Fusion लॉन्च करून लक्ष वेधलं होतं आणि आता Edge 60 Stylus या दुसऱ्या मॉडेलने या सिरीजचा दर्जा आणखी उंचावला आहे.
हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज अशा एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याची भारतात किंमत फक्त ₹22,999 ठेवण्यात आली आहे. motorola edge 60 stylus 23 एप्रिलपासून दुपारी १२ वाजता Flipkart, Motorola.in, तसेच रिलायन्स डिजिटलसह विविध रिटेल स्टोअर्सवर विक्रीस उपलब्ध होणार आहे.
या डिव्हाईसचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये इनबिल्ट स्टायलस देण्यात आलं आहे, ज्याचा वापर वापरकर्ते चित्रं काढण्यासाठी, स्केचिंग किंवा नोट्स लिहिण्यासाठी करू शकतात. यामुळे हा फोन केवळ एक स्मार्टफोन न राहता, एक प्रकारे क्रिएटिव्ह साधन बनतो.
डिझाईन आणि डिस्प्ले: प्रीमियम लुक आणि जबरदस्त ब्राइटनेस
Edge 60 Stylus मध्ये 6.7 इंचांचा 1.5K pOLED पंच-होल डिस्प्ले आहे. याला 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट असून 3000 निट्स इतका जबरदस्त ब्राइटनेस मिळतो. स्क्रीनचे संरक्षण Corning Gorilla Glass 3 ने करण्यात आलं आहे, त्यामुळे स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आणि मजबुत राहते.
फोनला IP68 रेटिंग मिळालेली असून, धूळ व पाण्यापासून संरक्षण मिळतं. त्याचबरोबर याला मिलिटरी ग्रेड MIL-STD-810H सर्टिफिकेशनही मिळालं आहे, म्हणजेच हा फोन खडतर परिस्थितीतही सहज टिकून राहतो.
हे पण वाचा ..Vivo T4 5G भारतात २२ एप्रिलला होणार लॉन्च; 7300mAh बॅटरीसह प्रचंड फिचर्सची तयारी
प्रोसेसर, सॉफ्टवेअर आणि स्टोरेज: परफॉर्मन्सला ब्रेक नाही
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असून, त्यासोबत Adreno 710 GPU दिला आहे. यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग अनुभव अगदी सुरळीत राहतो. यात 8 जीबी LPDDR4x RAM असून 256 जीबी UFS 2.2 स्टोरेज आहे. हवे असल्यास microSD कार्डच्या सहाय्याने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येतं.
फोन Android 15 आधारित Hello UI वर चालतो आणि कंपनी दोन वर्षांचे OS अपडेट्स व तीन वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे. हे अपडेट्स दीर्घकाळ टिकणारी परफॉर्मन्स सुनिश्चित करतात.
कॅमेरा सेटअप: Sony सेन्सरसह स्पष्ट आणि स्टाईलिश फोटो
motorola edge 60 stylus मध्ये ५० मेगापिक्सलचा Sony Lyt 700C मुख्य सेन्सर दिला आहे, जो OIS सपोर्टसह येतो. याचबरोबर १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि ३-इन-१ लाइट सेन्सर देखील आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामुळे पोर्ट्रेट शॉट्स आकर्षक आणि नैसर्गिक दिसतात.
बॅटरी आणि चार्जिंग: जलद चार्जिंगसह मोठी बॅटरी
फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. यासोबत 68 वॉटचा फास्ट चार्जर बॉक्समध्येच उपलब्ध आहे. त्याचबरोबर १५ वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टही यात दिला गेला आहे, जो याच प्राइस सेगमेंटमध्ये खूप दुर्मिळ आहे.
ऑडिओ आणि डिझाईन फिनिश: डॉल्बी अॅटमॉससह सराउंड अनुभव
फोनमध्ये Dolby Atmos सपोर्ट असलेले स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे फिल्म, गाणी किंवा गेमिंगमध्ये रिअलिस्टिक आणि सराउंड अनुभव देतात. फोन दोन आकर्षक PANTONE रंगांमध्ये उपलब्ध आहे – Surf the Web (नीळसर) आणि Gibraltar Sea (गडद निळा), जे याच्या प्रीमियम लुकला आणखी उठाव देतात. मागील पॅनलवर व्हेगन लेदर फिनिश देण्यात आली आहे, ज्यामुळे फोन हातात घेतल्यावर चांगला ग्रिप मिळतो.
येत्या काळात येणार Motorola Edge 60 Pro देखील
दरम्यान, कंपनी लवकरच Motorola Edge 60 Pro 5G नावाचा आणखी एक डिव्हाईस सादर करणार असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. याची किंमत ₹31,999 च्या आसपास असू शकते. यामध्ये ६.७ इंच AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज अशा दमदार स्पेसिफिकेशन्सची अपेक्षा आहे.
motorola edge 60 stylus हे डिव्हाईस त्याच्या स्टायलससह दिलेल्या युनिक फिचर्स, दमदार परफॉर्मन्स, आकर्षक डिझाईन आणि वाजवी किंमतीमुळे निश्चितच एक ‘value for money’ स्मार्टफोन ठरतो. सर्जनशील वापरकर्ते, विद्यार्थी, आणि व्यावसायिकांसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.