ADVERTISEMENT

दीप्ती केतकर पुन्हा नव्या रुपात; ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका या दिवशी पासून होणार सुरू

मराठी मालिकांच्या दुनियेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली अभिनेत्री दीप्ती केतकर Dipti Ketkar आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या आगामी मालिकेत ती अनुप्रिया नावाच्या भूमिकेत झळकणार असून, ही मालिका १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणार आहे.
Dipti Ketkar,

Dipti Ketkar: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती केतकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर ती आता सन मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, काही क्षणांतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

मालिकेत दीप्ती केतकर Dipti Ketkar अनुप्रिया नावाच्या एका संवेदनशील स्त्रीची भूमिका साकारत आहे — जी आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत, कोणतीही अपेक्षा न ठेवता नात्यांना जपते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दुःखात ती सहभागी होते, पण स्वतःची स्वप्नं मात्र मागे ठेवते. अशा या पात्रातून अनेक गृहिणींचं वास्तव उभं राहत असल्याने ही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.

‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत दीप्तीसोबत हरीश दुधाडे, आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. कलाकारांची ही दमदार फळी पाहून मालिकेची लोकप्रियता आधीच निश्चित असल्याचं समीक्षकांचे मत आहे.

भूमिकेबद्दल बोलताना दीप्ती केतकर Dipti Ketkar म्हणाली, “ही भूमिका माझ्या मनाला जवळची आहे. काही काळ मी अशाच पात्राची वाट पाहत होते. अनुप्रिया तिच्या कुटुंबासाठी जगते आणि तिच्या प्रेमातच तिला समाधान मिळतं. माझ्या आयुष्यात मला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे, पण अनुप्रियाच्या आयुष्यात तसं नाही.”

लग्नानंतर होईलच प्रेम फेम अनुष्का पिंपुटकर लग्नबंधनात अडकणार; फक्त ६ दिवस शिल्लक, Bride To Be पार्टीचे फोटो व्हायरल

तिने पुढे सांगितलं की, “माझ्या मुलीकडून ‘आई तू खूप छान काम करतेस’ हे ऐकणं माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे. या मालिकेत काम करणं म्हणजे माझ्यासाठी नव्या प्रवासाची सुरुवात आहे.” १ डिसेंबरपासून रोज रात्री ९:३० वाजता Sun Marathi वाहिनीवर प्रसारित होणारी ही मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवेल, असा विश्वास दीप्ती आणि तिच्या टीमला आहे.