Maruti Suzuki Alto K10 आता झाली महाग! जाणून घेवू नवीन किंमत आणि मायलेज!

Maruti Suzuki Alto K10

Maruti Suzuki कंपनीने आपल्या Maruti Suzuki Alto K10 च्या किमती येत्या वर्षांपासून वाढवल्या आहेत. आता ही कार किती महाग झाली आहे त्याचबरोबर ती किती मायलेज देते, हे घ्या जाणून!

Maruti Suzuki Alto K10 महाग झाली असून आपण त्या गाडीच्या नवीन किंमत आणि मायलेज संदर्भात जाणून घेऊया तर भारतीय बाजारात सर्वात स्वस्त कार म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर Maruti Suzuki Alto K10 चे नाव येते ही गाडीचा आकार लहान असला तरीही तिच्या उत्कृष्ट मायलेजमुळे ग्राहकांमध्ये ही कार अतिशय लोकप्रिय आहे.

अलीकडेच Maruti Suzuki ने Alto K10 च्या किमतीमध्ये वाढ केली आहे. परंतु त्यानंतर ही बाजारात या कारची मागणी वाढत आहे. तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता ही कार किती महाग झाली आहे ? आणि तिचे फीचर्स काय आहेत, आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया!

Maruti Suzuki Alto K10 ची नवीन किंमत ?

Maruti Suzuki कंपनीने Alto K10 च्या बेस STD (O) पेट्रोल वेरिएंटची किंमत 10,000 रुपयांनी वाढवली असून त्याचबरोबर CNG वेरिएंटमध्ये देखील 10,000 रुपयांची वाढ केली आहे. आणि VXI+ वेरिएंटची किंमत तब्बल 14,000 रुपयांनी वाढवली आहे. या कारची किंमत याआधी ₹3.99 लाख होती, आता ती ₹4.09 लाख झाली आहे.

वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती 35,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात अस Maruti Suzuki ने या आधीच जाहीर केले होते तरी ही अजून Alto K10 ही भारतातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या हॅचबॅक कार पैकी एक आहे.

Maruti Suzuki Alto K10 मधील इंजिन?

Alto K10 या कार मध्ये आपल्याला 1.0 लीटर, 3-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, ते 66 bhp ची पॉवर आणि 89 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. आणि तसेच यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT (ऑटोमॅटिक) गिअरबॉक्स चा पर्याय कंपनीने वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिला आहे Alto K10 ही कार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तसेच शहराच्या रस्त्यांसाठी सर्वांत उत्तम पर्याय मानली जाते!

Maruti Suzuki Alto K10 मायलेज – पेट्रोल,CNG वेरिएंट मधील फरक?

मायलेजच्या बाबतीत बोलायच झालं तर भारतातील सर्वाधिक इंधन बचत करणाऱ्या कारपैकी एक आहे Alto K10
पेट्रोल वेरिएंट: पेट्रोल वेरिएंट मध्ये ही कार 25 km/l पर्यंत मायलेज देते.
CNG वेरिएंट: CNG वेरिएंट मध्ये तब्बल 33 km/kg मायलेज देते. म्हणजेच CNG वेरिएंट खूपच किफायतशीर ठरते, त्यामुळे CNG वेरिएंट जास्त लोकप्रिय आहे.तुम्हाला जर जास्त मायलेज हवं असेल तर CNG व्हेरिएंट सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.

Maruti Suzuki Alto K10 चे फीचर्स –

छोट्या कारमध्ये मोठी वैशिष्ट्ये Alto K10 ही कमी बजेटमधील कार असली तरी या कार मध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

सुरक्षितता फीचर्स:
१) Dual Airbags – चालक आणि सह-चालकासाठी
२) ABS (Anti-lock Braking System)
३) Child Safety Lock आणि Rear Parking Sensors

कम्फर्ट आणि इंटीरियर:
१) फ्रंट पॉवर विंडोज
२) सेंट्रल कन्सोल आर्मरेस्ट
३) गियर शिफ्ट इंडिकेटर

लाईटिंग आणि व्हिजिबिलिटी:
१) हॅलोजन हेडलॅम्प आणि ऍडजेस्टेबल हेडलॅम्प

या सर्व फीचर्ससह सुसज्ज अशी Alto K10 ही कार छोटी असली तरी सुरक्षितता आणि कम्फर्टमध्ये उत्तम पर्याय आहे.

हे पण वाचा ..Kia EV4: सेडान आणि हॅचबॅकमध्ये उपलब्ध असलेली दमदार इलेक्ट्रिक कार!

Maruti Suzuki Alto K10 (फायदे व तोटे)

फायदे:
Maruti Suzuki Alto K10 खरेदी करण्याचे फायदे म्हणजे, ही कार भारतातील सर्वात स्वस्त कार मधील एक आहे
दुसरी गोष्ट म्हणजे ही कार पेट्रोलमध्ये 25 km/l आणि CNG मध्ये 33 km/kg पर्यंत दमदार मायलेज देते तसेच या कारची देखभाल किफायतशीर आणि गाडीचे स्पेअर पार्ट्स स्वस्त आहेतआणि ही कार Compact साईझ म्हणजे शहरात चालवायलाअतिशय सोपी आहे.

तोटे:
Maruti Suzuki Alto K10 ही थोडी छोटी आणि कमी स्पेस असलेली कार आहे तसेच मोठ्या कुटुंबासाठी म्हणजे जास्त लोक या कार मध्ये बसू शकत नाहीत त्यांच्या साठी ही कार योग्य पर्याय नाही. तसेच CNG वेरिएंटमध्ये बूट स्पेस कमी होतो

Maruti Suzuki Alto K10 ही नवीन किंमत वाढीमुळे खरेदी करावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर अजूनही सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी ही कार आहे.जर तुम्ही कमी बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असताल, तर Alto K10 ची किंमत वाढली असली तरी हा एक चांगला पर्याय आहे.

हे पण वाचा ..2025 Renault Kiger आणि Triber भारतात लॉन्च, पहा किंमत आणि फीचर्स!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *