Kalyani Group सादर करत आहे MArG 45 हा भारताचा आधुनिक Mounted Gun System!

MArG 45


भारतात Kalyani Group ने निर्माण केला MArG 45 Mounted Gun System.उत्कृष्ट मोबिलिटी आणि 36 किमीपेक्षा जास्त रेंज असलेली तोफ आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण आहे!

भारतातील आघाडीच्या संरक्षण कंपनींच्या यादीतील एक असलेल्या Kalyani Group ने आपला नवीन MArG 45 Mounted Gun System लाँच केला आहे. हा Made-in-India गन सिस्टममधील एक अत्याधुनिक प्रकार असून गतीशीलता, मारक क्षमता आणि मजबूत तंत्रज्ञानाचा उत्तम संगम आहे

कंपनीने हा नवा आर्टिलरी IDEX Abu Dhabi 2025 मध्ये जागतिक स्तरावर सादर केला. भारतीय संरक्षण क्षमतेसाठी हे आधुनिक शस्त्र एक महत्त्वपूर्ण पाऊल समजले जात आहे. चला तर मग, MArG 45 चे तांत्रिक वैशिष्ट्ये ,फीचर्स, यावर अधिक माहिती घेऊया!

भारताचा शक्तिशाली MArG 45 –Mounted Gun System

MArG 45 हा एक 4×4 All-Terrain Mobile Gun System आहे. याचा मुख्य ध्येय भारतीय लष्कराला हलक्या आणि वेगवान तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने सशक्त आणि सुसज्ज करणे हा आहे.”Go-Anywhere” अशी ही तोफ असून  कुठल्याही अडचणीत तैनात केली जाऊ शकते.या तोफेमध्ये “Shoot-and-Scoot”  या तंत्रज्ञानमुळे झपाट्याने फायर(गोळीबार) करून सुरक्षितत ठिकाणी जाता येते. हा Mounted Gun System विशेष म्हणजे वेगवान हालचाल आणि स्मार्ट अचूकतेच्या फायरिंगसाठी याला तयार करण्यात आले आहे.

Kalyani Group ने निर्माण केला भारताचा शक्तिशाली MArG 45 Mounted Gun System.

MArG 45 चे खास फीचर्स!

1. विशाल अशी मारक क्षमता

MArG 45 ही तोफ साधारण 36 किमीच्या पलिकडे फायरिंगची क्षमता आहे. 10 राउंड्स केवळ 3 मिनिटांत गोळीबार करू शकते. 1 तासात सलग 42 राउंड्स फायर करण्याची राउंड्स ताकद ठेवते. दुश्मनाच्या लष्करी तळांवर त्वरित आक्रमण   करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

2. प्रगत मोबिलिटी आणि तत्काळ तैनात.

MArG 45  हे एक हलके आणि आधुनिक 4×4 वाहनावर निर्मित तोफ आहे, त्यामुळे ती कुठेही केव्हाही तैनात करता येते.
खडतर आणि अतीदुर्गम भागांमध्येही सहज चालवता येते.
भारतीय लष्कराच्या आवश्यकतेनुसार झपाट्याने हालचाल करता येते. कमी वेळेत प्रतिकार करून जागा बदलण्याचे तंत्रज्ञान (“Shoot-and-Scoot”) या तोफेमध्ये आहे.”Game Changer” म्हणून भारतीय लष्करासाठी हे हत्यार ठरणार आहे.


3. “Made in India” तंत्रज्ञान आणि डिझाइन

Kalyani Group चे Bharat Forge या कंपनीच्या संरक्षण विभागाने MArG 45 पूर्णतः भारतामध्ये तयार केलेले आहे. या मॉडेल चे तंत्रज्ञान 100% स्वदेशी आहे आणि त्याचं बरोबर डिझाइन सुद्धा .भारतीय लष्करासाठी फक्त तयार केलेली तोफ आंतरराष्ट्रीय बाजारात याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जागतिक पातळीवर भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला मजबूत आणि शक्तिशाली करणारे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

हे पण वाचा ..2025 tvs ronin नवीन रंग आणि सेफ्टी अपडेटसह लाँच – पहा किंमत आणि फीचर्स

MArG 45: Kalyani Group चा महत्त्वपूर्ण उपक्रम

Bharat Forge चे प्रमुख चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक ( एमडी ) बाबा कल्याणी म्हणाले,
“MArG 45 Mounted Gun Platform हे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि मोठी क्रांती आहे. आमच्या ‘Designed and Made in India’ क्षमतांचे हे आदर्श उदाहरण आहे.”भारतीय संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आम्ही टाकले आहे.

MArG 45 – जागतिक बाजारात अत्याधुनिक उत्पादक

भारतीय लष्करासाठी खास डिझाइन केलेले शस्त्र म्हणजे MArG 45 हे आहे हे शस्त्र आंतरराष्ट्रीय दुबई येथे झालेल्या संरक्षण प्रदर्शनात Kalyani Group च्या भारत फोर्ज कंपनी कडून सादर करण्यात आले असून या शस्त्राला जागतिक स्तरावरही मागणी वाढली आहे.संरक्षण उत्पादनाच्या निर्यातीच्या दिशेने भारताचे एक ठोस पाऊल टाकले जात आहे.तसेच भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला MArG 45 मुळे जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

MArG 45 का विशेष आहे आणि ( फायदा )

36 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर अचूक फायरिंग करण्याची क्षमता यात आहे.MArG 45 हे वजनाने हलके आहे त्यामुळे ते लगेच एका जागेवरून दुसऱ्या जागी सहज हलवता येते. हे शस्त्र सर्व बाबतीत भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहे डिझाईन पासून ते निर्मिती पर्यंत त्यामुळे तंत्रज्ञानाच्या स्वावलंबनात भारताची प्रगती झाली आहे त्यामुळे देशाच्या सुरक्षा क्षमतांमध्ये सुधारणा होईल.भारतीय लष्कराला हे तंत्रज्ञान स्वावलंबी आणि शक्तिशाली बनवण्यास मदत करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *