ADVERTISEMENT

लोकप्रिय मराठी कपल मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर यांनी खरेदी केली पहिली कार

Marathi Couple New Car : मराठी टीव्ही जगतातील लोकप्रिय जोडपं मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर आता या दोघांनी आपल्या पहिल्या कारचं स्वप्नही साकार केलं आहे.
Marathi Couple New Car

मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसमोर आली आहे. लोकप्रिय Marathi Couple New Car चं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून घराघरात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मधुरा जोशी आणि तिचा पती, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सध्या झळकणारा अभिनेता गुरु दिवेकर यांनी नुकतीच आपली पहिली कार घेतली आहे.

अभिनेत्री मधुराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. “गणपती बाप्पा मोरया… आमची पहिली गाडी अखेर आमच्या घरी आली. पहिली गोष्ट नेहमीच खास असते, आणि ही आमच्या दोघांनी घेतलेली पहिली कार आहे,” असं कॅप्शन देत तिने आपल्या नव्या गाडीचा फोटो पोस्ट केला. या पोस्टनंतर काही क्षणांतच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

हा पुढचा प्रश्नच नाही!” लग्नाबद्दल विचारताच तेजश्री प्रधानची मजेशीर प्रतिक्रिया; डेस्टिनेशन वेडिंगवरही व्यक्त केलं मत

मधुरा आणि गुरु यांनी काही महिन्यांपूर्वीच आपलं हक्काचं पहिलं घर घेतल्याची बातमी सर्वत्र चर्चेत आली होती. त्यानंतर आता गाडीच्या खरेदीने त्यांच्या आनंदात आणखी एक रंग भरला आहे. या जोडप्याचं एकत्रित आयुष्य अनेक चाहत्यांसाठी प्रेरणादायी मानलं जातं. Marathi Couple New Car

गुरु दिवेकर सध्या झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सोहमची भूमिका साकारत असून, त्याच्या अभिनयाचंही चांगलं कौतुक होत आहे. तर मधुरा जोशी स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत नम्रता देसाई या भूमिकेत झळकत आहे. दोघांची ओळख ‘सारे तुझ्याचसाठी’ या सोनी मराठी मालिकेच्या सेटवर झाली होती. त्या वेळी सुरु झालेली मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली आणि आता दोघं एकत्र सुखी संसार करत आहेत.

मधुराच्या या आनंदाच्या पोस्टवर मेघा धाडे, सुलेखा तळवलकर, तेजस बर्वे, माधवी निमकर, सुकन्या मोने, रेवती लेले यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. मधुरा आणि गुरु या दोघांच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांच्या आयुष्यात आणखी अनेक यशाचे क्षण असेच उजळत राहोत, हीच सर्वांची इच्छा. Marathi Couple New Car