मंदार जाधवचा नवा लूक प्रेक्षकांसमोर; ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेसाठी घटवलं वजन!

K9n Hotis Tu Kay Zalis Tu Mandar Jadhav

Mandar Jadhav: स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत मंदार जाधव प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याने यश या नव्या पात्रासाठी वजन घटवण्यापासून ते व्यक्तिमत्त्वातील बारकावे शिकण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नवी मालिका ‘कोण होतीस तू, काय झालीस तू ” Kon Hotis Tu Kay Zalis Tu ” सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जयदीप-गौरीची जोडी या मालिकेद्वारे पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव या जोडीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

या मालिकेच्या पार्श्वभूमीवर मंदार जाधवने त्याच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत विशेष लक्षवेधी ठरते. एका मुलाखतीत मंदारने सांगितले की, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेतील त्याची भूमिका ‘यश’ नावाच्या तरुणाची आहे, जो वयाने सुमारे २५ वर्षांचा आहे. ही भूमिका साकारताना वयाचं भान आणि त्यानुसार दिसणं खूप महत्त्वाचं असल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्यामुळेच त्याने या पात्रात सच्चेपण आणण्यासाठी वजन घटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी दोन-तीन महिन्यांची तयारी केली.

नवीन भूमिकेबद्दल Mandar Jadhav म्हणाला

“आजची पिढी फार जागरूक आहे आणि त्यांच्यासमोर काही सादर करताना आपण खरे वाटलो पाहिजे. यश हा आधुनिक विचारसरणीचा मुलगा आहे. त्याच्या शरीरबोलीपासून ते दिसण्यापर्यंत सगळं तरुण वाटायला हवं. त्यामुळे मी माझ्या शरीरयष्टीवर काम केलं, आहारावर नियंत्रण ठेवलं आणि नियमित वर्कआउट केलं,” असं मंदारने सांगितलं.

या भूमिकेसाठी फक्त शारीरिक परिवर्तनच नाही तर मानसिक तयारीही मंदारने केली आहे. त्याने पुढे सांगितलं की, “जयदीप आणि यश या दोघांमध्ये खूप फरक आहे. जयदीप थोडा रागीट, प्रतिक्रिया देणारा होता. त्याचं बोलणंही थोडं खवळलेलं वाटायचं. पण यश मात्र खूप संयमी आहे. राग आला तरी तो तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच या दोन्ही भूमिका साकारताना अभिनयशैलीतही बदल आवश्यक होता.” mandar jadhav

कोण होतीस तू काय झालीस तू मालिके बद्दल

कोकणात या मालिकेचं चित्रीकरण सुरु झालं असून, गिरिजा प्रभू आणि मंदार जाधवसोबतच वैभव मांगले, सुकन्या मोने, अमित खेडेकर, अमृता माळवदकर आणि साक्षी गांधी यांसारखे अनुभवी कलाकारही मालिकेत झळकणार आहेत. मालिकेचा पहिला भाग २८ एप्रिलपासून स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

स्टार प्रवाहवरील ही नवी मालिका जुन्या आठवणी जागवणारी असली तरी यातील कथा आणि पात्रं ही पूर्णपणे नव्यानं रंगवलेली आहेत. यामुळे जुन्या मालिकेतील फॅन्सना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. त्यात मंदार जाधवसारखा मेहनती आणि समर्पित अभिनेता आपल्या नव्या रूपात दिसणार असल्यामुळे मालिकेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

देवमाणूस मालिकेमुळे नवरी मिळे हिटलरला मालिका होणार बंद? Navari Mile Hitlerla End?


कोण होतीस तू, काय झालीस तू’ ( Mandar Jadhav )ही मालिका फक्त मनोरंजनापुरती मर्यादित नाही, तर आजच्या तरुणांच्या विचारांना, त्यांची मनोभूमिका समजून घेण्याचा एक प्रयत्न देखील आहे. मंदार जाधवने यश साकारण्यासाठी घेतलेली मेहनत हेच सांगून जाते की कलाकार जेव्हा आपल्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हा त्यातून एक प्रभावी आणि लक्षवेधी सादरीकरण जन्माला येतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *