ADVERTISEMENT

मामा-मामी परतले! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेच्या एन्ट्रीवर वनिता खरातची भन्नाट पोस्ट

maharashtrachi hasyajatra onkar bhojane navi entry vanita post : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेची एन्ट्री होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वनिता खरातच्या खास पोस्टमुळे शोबद्दलची चर्चा अधिक रंगली आहे.
maharashtrachi hasyajatra onkar bhojane navi entry vanita post

maharashtrachi hasyajatra onkar bhojane navi entry vanita post : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून एकेकाळी घराघरात पोहोचलेला कलाकार ओंकार भोजने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर धमाकेदार अंदाजात परतला आहे. त्याच्या पुनरागमनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या एन्ट्रीवर अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या खास पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या विनोदी शोने मराठी मनोरंजन विश्वात वेगळी छाप निर्माण केली आहे. नवीन कलाकारांना आपलं टॅलेंट दाखवण्याचं हे व्यासपीठ ठरलं आहे. अभिनयासोबतच कमालीच्या कॉमिक टायमिंगमुळे ओंकार भोजनेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र काही काळानंतर त्याने या शोला रामराम केला आणि स्वतःचा स्वतंत्र प्रवास सुरू केला होता. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची चाहत्यांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली होती. अखेर ही वाट पाहणं संपलं असून ओंकार भोजनेची एन्ट्री पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर झाली आहे.

चाहत्यांना आता ‘मामा-मामी’ची धमाल पुन्हा अनुभवता येणार आहे. वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सेटवरील ओंकार भोजनेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिलं आहे, “मामा मामी is back… हा इथं काय करतोय… बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा — ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’!” तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

ओंकार भोजने आणि वनिता खरात या जोडीने पूर्वी सादर केलेली स्किट्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या संवादातील विनोद, अभिनयातील सहजता आणि कॉमिक केमिस्ट्रीमुळे प्रेक्षक हसून हसून लोटपोट व्हायचे. त्यामुळे आता त्यांची ही जोडी पुन्हा मंचावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता दुप्पट झाली आहे.

शोचा नवीन प्रोमोही सोशल मीडियावर झळकला असून ओंकारच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “ओंकार परतलाय म्हणजे धमाल होणारच!”, “मामा मामी बघायचंच!”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

हे पण वाचा.. आता संसारही होईल.., ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी-समरचं लग्न, पण प्रेमाचं काय? Vin Doghatli Hi Tutena

आता या सिझनमध्ये ओंकार भोजने कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार आणि कोणती भन्नाट स्किट्स प्रेक्षकांसमोर सादर करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठी टेलिव्हिजनवरील हा सुपरहिट शो पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाला आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतर झीशान कादरीचे अमाल मलिक आणि बसीर अलीवर गंभीर आरोप Zeishan Quadri

maharashtrachi hasyajatra onkar bhojane navi entry vanita post