‘बिग बॉस १९’चा रंगतदार प्रवास सुरू असतानाच या शोमधील एक स्पर्धक Zeishan Quadri चा खेळ थांबला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमध्ये अशनूर कौर, बसीर अली आणि Zeishan Quadri हे तिघे नॉमिनेट झाले होते. मात्र, प्रेक्षकांच्या मतांनुसार झीशानचा प्रवास संपुष्टात आला.
शोमधून बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या अनुभवांबद्दल आणि सहस्पर्धकांबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केलं. Zeishan Quadri यांनी सांगितलं की, “मी पहिल्याच आठवड्यात बाहेर पडण्यासाठी तयार होतो. त्यामुळे एलिमिनेशनमुळे मला काही धक्का बसला नाही. पण माझ्या सहस्पर्धकांकडून झालेल्या वागणुकीनं थोडं मन दुखावलं.” त्यांनी विशेषत: अमाल मलिक आणि बसीर अली यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत म्हटलं की, “मी त्यांना माझ्या लहान भावांसारखं वागवलं, पण ते माझ्याबद्दल वाईट बोलत होते. जर मला हे आतच कळलं असतं, तर गोष्ट वेगळी असती. मी त्यांच्या गटाचा लीडर होतो आणि सगळ्यांना एकत्र ठेवत होतो. मात्र आता समजलंच की ते मला घाबरत होते.”
झीशाननं गौरव खन्नाबद्दलही भाष्य केलं. “गौरव सुरुवातीच्या दिवसांत लीडर बनण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला थांबवलं. त्यानंतर तो शांत झाला आणि आजही तसाच आहे,” असं तो म्हणाला.
तान्या मित्तलविषयी बोलताना Zeishan Quadri म्हणाला, “तान्या ही खूप चांगली स्पर्धक आहे. तिनं माझी शोमध्ये खूप काळजी घेतली. आम्ही दोघांनी एकमेकांना सपोर्ट केलं. आमचं नातं शोच्या बाहेरही असंच कायम राहील.” याशिवाय झीशाननं निर्मात्यांकडून झालेल्या वागणुकीबद्दलही नाराजी व्यक्त केली. “चौथ्या आठवड्यानंतर मला कोणतंही मार्गदर्शन दिलं गेलं नाही, तर इतरांना सूचनाही आणि व्हिडीओ क्लिप्स दाखवण्यात आल्या. त्यामुळे मला थोडं अन्यायकारक वाटलं,” असं तो म्हणाला.

झीशान क्वाद्रीचा हा खुलासा समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्येही चर्चा रंगली आहे. काहींनी त्याच्या प्रामाणिक मताचं कौतुक केलं, तर काहींनी हे ‘गेम स्ट्रॅटेजी’चा भाग असल्याचं म्हटलं. परंतु एवढं नक्की की Zeishan Quadri ने ‘बिग बॉस १९’चा प्रवास संपवल्यानंतरही शोच्या बाहेर आपलं मत ठामपणे मांडून पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.









