ADVERTISEMENT

सखीने मागितला कान्हाकडे घटस्फोट! ‘लपंडाव’ मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

lapandav sakhi kanha divorce promo : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतील "लपंडाव" च्या नव्या प्रोमोमध्ये सखी आणि कान्हा यांच्या नात्यात मोठा वळण दाखवण्यात आला असून, सखीने थेट कान्हाकडे घटस्फोटाची मागणी केल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
lapandav sakhi kanha divorce promo

lapandav sakhi kanha divorce promo : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “लपंडाव” च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये सखी आणि कान्हा यांच्या नात्यात निर्माण झालेला तणाव स्पष्टपणे दिसून येतो. एका कॅफेमध्ये घडणाऱ्या या दृश्यात सखीच्या हातात घटस्फोटाच्या कागदपत्रांची फाईल असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, ती कान्हाशी या विषयावर थेट बोलण्यास टाळाटाळ करताना दिसते.

प्रोमोमध्ये सखी गोंधळलेल्या अवस्थेत असून ती कान्हाला सांगावे की नाही, या द्विधा मनस्थितीत आहे. ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच कान्हा तिला थांबवतो आणि विचारतो, “कुठे निघालात तुम्ही?” यावर पुढे संवादाची मालिका सुरू होते.

कान्हा जेव्हा सखीला विचारतो की “तुम्ही मला काय देणार होतात?”, तेव्हा सखी हातातील फाईल त्याच्याकडे देते. फाईल पाहून कान्हा थोडा संभ्रमात पडतो आणि विचारतो की त्यात काय आहे. त्यावर सखी स्पष्टपणे सांगते, “हे घटस्फोटाचे पेपर आहेत.” हे ऐकताच कान्हाच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे दिसते आणि वातावरण गंभीर होते.

यानंतर सखी ठामपणे म्हणते, “मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे, मिस्टर कान्हा महाडिक… उर्फ कबीर किर्लोस्कर.” ती पुढे स्पष्ट करते की या विषयात तिला कोणताही खेळ किंवा उशीर नको आहे. तिच्या मते, तिने आधीच तिच्या सह्या केल्या आहेत आणि आता फक्त कान्हाने सही करून हा विषय संपवावा.

या प्रोमोमधील भावनिक प्रसंगामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सखीचा ठाम निर्णय आणि कान्हाची प्रतिक्रिया यामुळे पुढील भागात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा” मालिकेच्या प्रोमोमध्ये भावनिक वळण; अर्णव–वडिलांच्या भेटीने उलगडणार नात्यांचे सत्य

lapandav sakhi kanha divorce promo

स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, “सखी मागतेय कान्हाकडे घटस्फोट… कान्हा काय निर्णय घेणार हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.” या एका वाक्यानेच प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

हे पण वाचा.. कमळी फेम अभिनेत्री सरीका नवाथे यांचे पती KBC चे पहिले करोडपती

आता पुढील भागात कान्हा काय निर्णय घेतो आणि सखीचा हा निर्णय किती दूरपर्यंत परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.