ADVERTISEMENT

लक्ष्मी निवास’मध्ये ७ वर्षांचा लीप! तुषार दळवींची मालिकेतून एक्झिट, भावना-सिद्धूमध्ये दुरावा; नव्या कथानकाची उत्सुकता शिगेला

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist : 'लक्ष्मी निवास' मालिकेत लवकरच तब्बल सात वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. या बदलानंतर अनेक पात्रांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसणार असून, तुषार दळवींच्या एक्झिटने चाहत्यांना धक्का बसला आहे. भावना-सिद्धूमधील दुरावा, लक्ष्मीचं यशस्वी उद्योजिका म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात आणि जयंतच्या पुनरागमनाचे संकेत यामुळे मालिकेतील आगामी भाग अधिक रंजक ठरणार आहेत.
lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist : ‘लक्ष्मी निवास’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना आता मोठा बदल अनुभवायला मिळणार आहे. कथानकात तब्बल सात वर्षांची झेप घेतली जाणार असून या काळात प्रत्येक पात्राच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडलेले दिसतील. नुकताच समोर आलेल्या प्रोमोने या नव्या पर्वाची झलक दाखवली असून, त्यानंतर मालिकेबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लीपनंतर दळवी कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदललेले दिसते. संघर्षातून पुढे आलेली लक्ष्मी आता यशस्वी उद्योजिका बनली आहे. तिच्या मेहनतीमुळे तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असलं, तरी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी मात्र कायम आहे. कारण तिच्या प्रत्येक स्वप्नाला साथ देणारे श्रीनिवास आता या जगात नसल्याचं कथानकातून दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत दिसणारे ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी यांचा मालिकेतील प्रवास संपल्याचं स्पष्ट झालं आहे.

तुषार दळवींच्या एक्झिटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेच्या नावातच ‘निवास’ असताना श्रीनिवासचं पात्र संपवण्याची गरज काय होती, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या व्यक्तिरेखेशिवाय कथानक अपूर्ण वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, लीपनंतर लक्ष्मी आणि तिची मुलगी भावना यांच्या नात्यात मोठा दुरावा निर्माण झालेला दिसतो. गेल्या सात वर्षांपासून भावना आईशी बोलत नसल्याचं प्रोमोमध्ये सूचित करण्यात आलं आहे. या दुराव्यासाठी ती लक्ष्मीलाच जबाबदार मानते. मात्र सिद्धू हे नातं पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. त्यामुळे या कुटुंबातील तणाव कसा मिटणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे जान्हवी आणि विश्वा यांचं आयुष्य आनंदाने पुढे सरकलं आहे. दोघांनी संसाराला सुरुवात केली असून त्यांना मुलगाही आहे. तसेच भावनाच्या मुली आता मोठ्या झालेल्या दिसतात. त्यातील आनंदी या भूमिकेत अभिनेत्री शुभवी गुप्ते नव्याने झळकणार असल्याने मालिकेत आणखी एक महत्त्वाची एन्ट्री झाली आहे.

हे पण वाचा .. Video: ‘तारिणी’मध्ये मोठं संकट येणार? पूजा सुरू असतानाच घडला अपशकुन; तारिणी-केदारची नवी परीक्षा सुरू

मात्र कथानकातील सर्वात मोठं रहस्य जयंतच्या पुनरागमनाचं आहे. गेल्या सात वर्षांपासून तो तुरुंगात असल्याचं दाखवण्यात आलं असून, आता त्याची सुटका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लक्ष्मी आणि जान्हवीविषयी मनात सूडाची भावना ठेवून तो पुन्हा त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सात वर्षांच्या लीपनंतरचे भाग १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बदललेली नाती, नव्या जबाबदाऱ्या, जुन्या वैराचा अध्याय आणि नव्या संघर्षांनी भरलेला हा प्रवास प्रेक्षकांसाठी अधिक रंगतदार ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

हे पण वाचा .. Video: ‘तारिणी’मध्ये नवा सस्पेन्स! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; एका फोन कॉलमुळे कथेला धक्कादायक वळण

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist