Lakshmi Nivas Jahnavi Comeback ‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच एक नवीन वळण येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी या पात्राच्या गायब होण्याचा ट्रॅक सुरु होता, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. मालिकेतील जयंतने पाण्यात उडी मारल्यानंतर जान्हवी कायमची निघून गेली असं गृहीत धरलं होतं. मात्र आता कथानकात मोठा ट्विस्ट येत असून, जान्हवी सुखरूप वाचल्याचं उघड झालं आहे.
या घटनेनंतर जान्हवीला पोलिस तिच्या घरी परत पाठवणार असतात, पण जयंतचा पुन्हा त्रास सहन करावा लागेल या भीतीने ती स्वतःचं नाव ‘तनुजा’ असल्याचं सांगते. तिची भेट विश्वाच्या वडिलांशी होते, आणि ते तिला घरी घेऊन येतात. आता दिग्विजयच्या घरी जान्हवी (तनुजा) आणि विश्वाची भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
“लक्ष्मी निवास” मालिकेचा हृदयस्पर्शी प्रोमो ; जान्हवीच्या जाण्याचं सत्य लक्ष्मी स्वीकारेल का?
या दरम्यान, जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा सेटवर परतली आहे. यावेळी मात्र तिचं आगमन दळवी कुटुंबात नव्हे तर देशमुखांच्या घरात झालं आहे. सेटवर तिचं स्वागत अतिशय खास पद्धतीने करण्यात आलं. संपूर्ण युनिटने एकत्र येऊन केक कापून दिव्याचं स्वागत केलं, आणि अभिनेत्रीने सहकलाकारांना केक भरवून आभार मानले.
दिव्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं, “सर्वांनी इतकं प्रेमाने स्वागत केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.” या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट करत लिहिलं, “जयंतकडे परत जा ग बाई… लक्ष्मीची अवस्था बघवत नाहीये”, “जयंतला एक संधी दे”, तर काहींनी लिहिलं, “लक्ष्मी अजूनही तुझी वाट बघतेय…”
प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, जान्हवीची खरी ओळख दिग्विजयला कधी समजणार? आणि लक्ष्मी तिच्या लेकीला पुन्हा भेटणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. Lakshmi Nivas Jahnavi Comeback या नव्या ट्रॅकमुळे मालिकेच्या कथानकाला पुन्हा एकदा नवा रंग मिळाल्याचं स्पष्ट दिसत आहे, आणि चाहत्यांसाठी हा पुनरागमनाचा क्षण भावनिक ठरत आहे.









