lagnanantar hoilach prem parth kavya mangalsutra new promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली आहे. पार्थ आणि काव्या या जोडीतील नातं आता हळूहळू प्रेमाच्या नव्या वळणावर येतंय. सुरुवातीला नवऱ्याबद्दल तिरस्कार असलेली काव्या आता त्याच्याच प्रेमात गुंतली आहे. तिच्या मनात पार्थसाठी प्रेम जागं झालं असलं, तरी ती अजूनही ते त्याच्यासमोर व्यक्त करू शकलेली नाही. दुसरीकडे, पार्थदेखील तिच्याविषयीच्या भावना शब्दांत मांडण्याची योग्य वेळ शोधत आहे.
या नात्याची गोडी वाढवणारा एक रोमँटिक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात पार्थ आपल्या बायकोसाठी म्हणजेच काव्यासाठी खास दागिना घेण्याचा विचार करताना दिसतो. तो मानिनीशी याबद्दल बोलतो, आणि ती त्याला सांगते की लग्न मनाविरुद्ध झालं असलं तरी आता नातं नव्याने स्वीकारण्यासाठी ‘मंगळसूत्र’ तयार कर. या सल्ल्याने पार्थ विचारात पडतो आणि ठरवतो की या मंगळसूत्राचं डिझाइन काहीतरी अनोखं असावं.
दरम्यान, काव्या कॉफी घेऊन येते आणि तिचा पाय घसरतो. पार्थ तिला सावरतो, पण तिच्या हातातील कॉफी कागदावर सांडते. त्या कागदावर लिहिलेलं असतं “काव्यार्थ”. या छोट्याशा घटनेतूनच पार्थला एक सुंदर कल्पना सुचते — आपल्या आणि काव्याच्या नात्याचं प्रतीक म्हणून तो मंगळसूत्रावर “काव्यार्थ” नाव कोरणार आहे.
या रोमँटिक क्षणाने ‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेचे चाहते भारावले आहेत. सोशल मीडियावर ‘काव्यार्थ’ फॅनपेजेसवर आनंद व्यक्त केला जात आहे. पार्थच्या या gesture ने मालिकेतला भावनिक प्रवास आणखी गहिरा झाला आहे.
दरम्यान, मालिकेतील इतर पात्रांचंही आयुष्य बदलत्या टप्प्यावर आहे. जीवा आणि नंदिनीच्या जीवनात अडचणी वाढल्या आहेत. भास्करच्या फसवणुकीमुळे जीवाला कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या घटनांदरम्यान पार्थ आणि काव्याचं प्रेम कितपत बहरतं आणि काव्याला पार्थचं खास मंगळसूत्र आवडतं का, हे येत्या भागांत स्पष्ट होईल.
हे पण वाचा.. एका रात्रीत ‘नॅशनल क्रश’ बनली मराठमोळी गिरिजा ओक; निळ्या साडीतील लूकवर चाहत्यांची भुरळ
‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या या नवीन टप्प्याने मालिकेचा रोमँटिक अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात स्थान मिळवत आहे.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली’ फेम निशाद भोईरला मिळाली सिनेमाची संधी; ट्रेनमध्ये लागलं ‘गोंधळ’चं पोस्टर पाहून झाला भावूक









