मोहनलाल आणि प्रितीविराज सुकुमारन यांच्या बहुप्रतीक्षित ‘l2 empuraan’ चित्रपटाच्या प्रमोशनला उशीर होत असल्याने चाहते चिंतेत..!
मल्याळम सिनेसृष्टीत प्रचंड अपेक्षा निर्माण करणारा
l2 empuraan’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मोहनलाल आणि प्रितीविराज सुकुमारन या दोन दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिकेतून येणाऱ्या या थरारक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २७ मार्च २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सिनेमाच्या प्रमोशनल बाबतीत प्रेक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता आणि चर्चा रंगू लागली आहे.
चाहत्यांच्या मनात उत्सुकता प्रचंड असली तरी, चित्रपटाच्या प्रमोशनबाबतची शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. काही चाहत्यांनी थेट सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “पोस्टर्स नाहीत, ट्रेलर नाही, कोणतीही मुलाखत नाही, प्रमोशनल इव्हेंट नाहीत, अगदी कोणतीही माहिती मिळत नाहीये… फक्त १४ दिवस उरलेत आणि मल्याळम इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा सिनेमा अजून शांत आहे!” अशा शब्दांत ते आपली निराशा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, काही चाहत्यांनी आश्वासनही दिलं आहे की, l2 empuraan शी संबंधित सर्व अडचणी सोडवल्या गेल्या आहेत आणि लवकरच ट्रेलर लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे, हे ट्रेलर केरळबाहेर कुठे तरी प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचं बोललं जातंय. प्रदर्शना बाबत कोणताही बदल झालेला नाही आणि ठरल्याप्रमाणे २७ मार्चला सिनेमा थिएटरमध्ये झळकणार असल्याची खात्रीही चाहत्यांना दिली जात आहे.
तरीही, अशिर्वाद सिनेमा आणि लाइका प्रोडक्शन्स यांच्यातील वितरक हक्कांबाबतचा वाद ही प्रमोशनल रणनीतीतील अडचणीला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. लाइका प्रोडक्शन्सच्या आर्थिक समस्या आणि त्यांचा गुंतवणुकीचा मुद्दा यामुळे दोन्ही प्रोडक्शन हाउसेसमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. लाइकाला प्रकल्पातून बाहेर काढण्याचा विचार अशिर्वाद सिनेमा करत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, लाइका प्रोडक्शन्सने सुमारे ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक परत मिळावी अशी मागणी केली आहे. याशिवाय, अतिरिक्त १० कोटी रुपये दिले जाण्याची अटही त्यांनी ठेवली आहे. या आर्थिक गुंतागुंतीमुळे सिनेमाच्या प्रमोशनल पोस्टर्स आणि ट्रेलरच्या प्रकाशनाला विलंब होत असल्याची चर्चा आहे.
प्रितीविराज सुकुमारन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मोहनलाल प्रमुख भूमिकेत आहेत.
l2 empuraan मध्ये मोहनलाल एका ग्रे शेड्स असलेल्या पात्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या पात्राचं नाव आहे खुरेशी अब्राहम, उर्फ स्टीफन नेडुंपल्ली. या भूमिकेमुळे त्यांच्यावर मोठ्या अपेक्षा आहेत. सिनेमाच्या कथानकात गुंतागुंत, राजकारण, सामर्थ्य आणि सत्ता यांचा रोमांचक संगम पाहायला मिळेल, असं बोललं जातंय.
हे पण वाचा..वादाच्या झळांनंतर apoorva mukhija Insta वर परतली..तिचा मेसेज काय सांगतो?
प्रितीविराजने नुकताच आपल्या सोशल मीडिया हँडलवर मोहनलालचा एक नवीन पोस्टर शेअर केला. काळ्या कपड्यांतील मोहनलालचा हा लूक पाहून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. पोस्टरवर एक इंटरेस्टिंग ओळ लिहिली आहे – “At your highest moment… be careful! That’s when… The Devil comes for you!” ही ओळ सिनेमाच्या कथानकाबाबत कुतूहल वाढवणारी आहे.
दरम्यान,l2 empuraan मध्ये मोहनलालसह टोविनो थॉमस आणि मन्जू वॉरिअर हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचं संगीत दीपक देव यांनी दिलं आहे. तांत्रिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण आणि त्यात वापरलेली आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा सिनेमा एक भव्य प्रकल्प ठरणार आहे.
जरी सध्याच्या घडामोडींमुळे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अडथळे आले असले तरी, चाहत्यांची अपेक्षा अजिबात कमी झालेली नाही. बऱ्याच शहरांमध्ये सिनेमाच्या शोसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू असून, काही ठिकाणी फॅन शोसाठी सर्व तिकिटं विकली गेली आहेत. प्रेक्षक स्वतःहून थिएटरमध्ये अधिक स्क्रीन्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून मोहनलालच्या या बिग बजेट सिनेमाला शानदार ओपनिंग मिळेल.
काही नेटिझन्सचं म्हणणं आहे की, प्रमोशनपेक्षा चित्रपटाची कथा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक महत्त्वाचा आहे. “#2018” आणि “#ManjummelBoys” यांसारख्या चित्रपटांनीही २०० कोटींचा आकडा पार केला होता, हे केवळ त्यांच्या दमदार कंटेंटमुळे शक्य झालं. त्यामुळे ‘एल 2: एंपुरान’लाही जर प्रेक्षकांनी स्वीकारलं, तर हा सिनेमा मल्याळम सिनेसृष्टीच्या शिखरावर पोहोचू शकतो. अगदी “नेरू”सारख्या कोर्टरूम ड्रामाने देखील ९० कोटींची कमाई केली होती!
एकंदरीत,l2 empuraan ची रिलीज डेट जसजशी जवळ येतेय, तसतशी चाहत्यांमध्ये उभारी आहे. प्रमोशनल अडचणी असूनही, सिनेमा ठरल्याप्रमाणे २७ मार्च २०२५ ला रिलीज होणार असल्याची मोठी अपेक्षा आहे. आता फक्त अधिकृत ट्रेलरची आणि प्रमोशनल कॅम्पेनची घोषणा होण्याची वाट पाहत प्रेक्षक उत्सुकतेने थांबले आहेत.