kushal badrike emotional year end post : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता Kushal Badrike सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. वैयक्तिक आयुष्यापासून ते मनातल्या भावना, साधे विचार आणि अनुभव तो प्रामाणिकपणे मांडताना दिसतो. सरत्या वर्षाला निरोप देताना कुशलने शेअर केलेली एक पोस्ट सध्या चाहत्यांच्या मनाला चांगलीच भिडत आहे. कोणताही दिखाऊपणा नसलेलं, पुरस्कारांची किंवा मोठ्या यशाची यादी न मांडता, जगण्याकडे पाहण्याचा त्याचा साधा दृष्टीकोन या पोस्टमधून समोर आला आहे.
Kushal Badrike याने आपल्या पोस्टमध्ये वर्ष सरल्याची तुलना थेट ट्रेनच्या प्रवासाशी केली आहे. स्टेशन बदलतात तसं सहजपणे एक वर्ष गेलं आणि दुसरं आलं, असं तो सांगतो. या वर्षात आपण काही ‘खतरनाक’ केलं नाही, ना मोठे पुरस्कार मिळवले, ना अभिनयात काही क्रांतिकारी बदल घडवले, हे तो अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. मात्र, या सगळ्या गोष्टी नसतानाही हे वर्ष शांतपणे, श्वास घेत घेत जगल्याचं समाधान त्याच्या शब्दांतून जाणवतं.
करीयरच्या मृगजळामागे जीव तोडून धावणं, अवास्तव स्वप्नांचं ओझं पापण्यांवर घेणं किंवा सतत काहीतरी सिद्ध करण्याची घाई – या सगळ्यांपासून दूर राहिलेलं हे वर्ष त्याच्यासाठी वेगळं ठरलं, असं तो सांगतो. मोठे तत्त्वज्ञ ‘Just breathe’ असं जे सांगतात, ते प्रत्यक्षात जगून पाहिलं, असं म्हणत Kushal Badrike जगण्यातील साधेपणाचं महत्त्व अधोरेखित करतो.
या पोस्टमधून कुठलाही तक्रारीचा सूर नाही, ना अपयशाची खंत आहे. उलट, “जन्माला आल्यासारखं, जरा जगून घेतल्यासारखं वाटतं,” या ओळीतून समाधान आणि शांततेची भावना व्यक्त होते. कधीकधी थांबून श्वास घेणं, स्वतःसाठी जगणंही तितकंच महत्त्वाचं असतं, हे कुशलच्या या लिखाणातून अधोरेखित होतं.
हे पण वाचा.. २०२५ ने मला खूप काही शिकवलं’ – जुई गडकरीची भावनिक पोस्ट चर्चेत
या भावुक पोस्टला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कुशलच्या अनेक सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी त्याच्या प्रामाणिक विचारांचं कौतुक केलं आहे. मोठ्या यशाच्या चमकदार गोष्टींपेक्षा साध्या जगण्याचं सौंदर्य मांडणारी Kushal Badrike याची ही पोस्ट अनेकांना स्वतःकडे पाहायला भाग पाडते, एवढं मात्र नक्की.
हे पण वाचा.. ८ वर्षांनंतर पुन्हा सासू-सुनेची केमिस्ट्री; ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत स्टार प्रवाहची ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार









