झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ ही प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेली एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अडीच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि अनेक कलाकार घराघरात पोहोचले. या मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत झळकलेल्या तेजश्री प्रधानने ( Tejashri Pradhan ) चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. तिच्या साध्या, गोड आणि सकारात्मक भूमिकेमुळे ती घराघरातील लाडकी सून झाली. याच मालिकेत जान्हवीच्या आईच्या भूमिकेत आशा शेलार झळकल्या होत्या. मालिकेतील आई-मुलीच्या या नात्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि आता इतक्या वर्षांनंतरही हे नाते तसंच घट्ट आहे, हे तेजश्री प्रधानच्या नव्या पोस्टमधून दिसून येत आहे.
Table of Contents
मालिकेतील सावत्र आईशी झाली भेट
अभिनेत्री तेजश्री प्रधान ( Tejashri Pradhan ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. अलीकडेच तिने आपल्या ऑनस्क्रीन आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने आशा शेलार यांच्यासाठी खास भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोमध्ये तेजश्री लाल रंगाच्या सुंदर वनपीसमध्ये दिसत आहे, तर आशा शेलार पिवळ्या साडीत दिसत आहेत. या पोस्टसोबत तिने लिहिले आहे, “मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि तू सर्वांसाठीच एक प्रेरणा आहेस.” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने प्रेक्षकांवर मोठा प्रभाव टाकला होता. या मालिकेत सुप्रिया पाठारे, लीना भागवत, रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते, मनोज जोशी, अतुल परचुरे, प्रसाद ओके यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. मालिकेतील नातेसंबंध आणि कथा यामुळे प्रेक्षकांनी तिला प्रचंड प्रेम दिले. विशेषतः जान्हवी आणि तिच्या सहा सासवा यांचे नाते, तिचे श्रीसोबतचे प्रेम, आणि कौटुंबिक नात्यांवर दिला गेलेला भर यामुळे ही मालिका गाजली.
तेजश्री प्रधान ( Tejashri Pradhan ) सध्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसते. अलीकडेच ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील सहकलाकारांना भेटली होती. योगेश केळकर, आयुष भिडे, कोमल सोमारे आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांच्यासोबत तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर ती प्रवासाचा आनंद घेताना दिसते. श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला तिने नुकतीच भेट दिली होती, ज्याचे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले होते.
Ankita Walawalkar चा कुणाल सोबत लग्नासाठी आधी नकार, पण यामुळे दिला होकार!
सध्या काय करत आहे Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती सध्या कोणत्या नवीन मालिकेत किंवा चित्रपटात झळकणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तिच्या पोस्टमधून ती स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेत असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, चाहत्यांना तिच्या नव्या भूमिकांसाठी प्रतीक्षा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील तिचे नाते अजूनही टिकून आहे, हे पाहून चाहत्यांनाही आनंद होत आहे.