ADVERTISEMENT

Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेतील विद्या उर्फ साक्षी महाजन लग्नबंधनात अडकणार

स्टार प्रवाहवरील Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेत प्रेक्षकांना सध्या लग्नसोहळ्याची मजा मिळते आहे. पण आता या मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजन खऱ्या आयुष्यातही लग्न करणार असल्याचं तिनं स्वतः कबूल केलं आहे.
Kon Hotis Tu Kay Zalis Tu actress wedding

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “Kon Hotis Tu Kay Zalis Tu” सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. सतत बदलणारे ट्विस्ट आणि हटके कथानकामुळे ही मालिका चर्चेत आहे. मालिकेत यश–अमृता आणि कावेरी–उदय यांचा लग्नसोहळा सध्या रंगतो आहे, पण याच मालिकेतील एक अभिनेत्री खऱ्या आयुष्यात देखील लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदवार्ता समोर आली आहे.

मालिकेत ‘विद्या’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी महाजन हिने स्वतः पुढील वर्षी विवाह होणार असल्याची कबुली दिली आहे. एका खास मुलाखतीत तिने हे गुपित उघड केलं. तिच्या या खुलाशानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Kon Hotis Tu Kay Zalis Tu

साक्षीनं सांगितलं की, “हो, मी पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. सध्या मनात खूप विचार सुरू आहेत – साडीचा रंग, मेकअप स्टाइल, फाउंडेशन, हेअरस्टाईल… सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हा माझ्या आयुष्यातील खास क्षण असणार आहे आणि मला तो अविस्मरणीय करायचा आहे.”

तिची सहकलाकार आणि जिवलग मैत्रीण साक्षी गांधी हिनेही या गोष्टीवर शिक्कामोर्तब करत मजेशीर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “लग्नाचा विषय आला की महाजन खूपच उत्सुक होते. तिच्या बोलण्यातून मला अनेक नवीन शब्द कळाले – वेडिंग फाउंडेशन, वेडिंग लिपस्टिक, वेडिंग व्हॅनिटी… तिच्या लग्नात खूप धमाल होणार यात शंका नाही.”

सावळ्याची जणू सावली मालिकेत मानसी कुलकर्णीची एन्ट्री; सारंग–सावलीच्या नात्यात नवं वादळ Savlyachi Janu Savali

यावर अधिक खुलासा करताना महाजन म्हणाली, “मालिकेत लग्नाचे शूटिंग सुरू असल्याने कलाकार मला सतत चिडवतात. मंदार जाधव, सुकन्या मोने ताई सगळेच गंमत करतात. पण खरी मजा म्हणजे माझ्या लग्नात साक्षी गांधी माझी करवली असणार आहे. मी तिला आधीच सांगितलंय की, माझ्या चिडचिडीच्या क्षणी ती माझ्या जवळ हवीच.”

गमतीची बाब म्हणजे, Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेत विद्या (साक्षी महाजन) आणि यमुना (साक्षी गांधी) एकमेकींच्या विरोधात दाखवल्या जातात. मात्र, कॅमेऱ्याबाहेर त्या उत्तम मैत्रीणी आहेत. सोशल मीडियावर दोघींचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होताना दिसतात.

म्हणजेच, मालिकेतील काल्पनिक लग्नसोहळ्याबरोबरच खरी आयुष्यातील हा आनंदाचा सोहळा प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरणार आहे. आता साक्षी महाजनच्या लग्नाची तारीख आणि त्यातील सेलिब्रेशन कसं असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.