मंडळी ऑनलाईन पैसे कमवणे आज काल तेवढं कठीण राहिलेलं नाहीये तुम्ही कॉलेज स्टूडेंट असाल कुठे नोकरी करत असाल किंवा तुम्हाला मुख्य इन्कम सोर्स म्हणून जरी करायचा असेल तरी देखील तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्मवरून बक्कळ पैसा कमवू शकता 2025 मध्ये, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग सांगणार आहे, मी तुम्हाला तेच मार्ग सांगेन जे काम करतात आणि तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता.
तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा.
Table of Contents
युट्युब ( Youtube )
सगळ्यात पहिलं आहे youtube, यूट्यूबच्या माध्यमातून सध्याला तुम्ही बक्कळ असा पैसा कमवू शकताय youtube मध्ये तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम अश्या दोन्ही प्रकारे काम करू शकता.
त्याचबरोबर युट्युबला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लॉन्ग व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओ टाकू शकता, त्यानंतर तुम्हाला तुमचं चैनल मॉनिटाइज करावं लागेल त्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्राईबरची गरज आहे त्याचबरोबर 4000 तासाचा watch time किंवा 90 दिवसांमध्ये 10 मिलियन short views हवे आहेत.
त्यानंतर तुमचे चॅनल ओरिजनल कंटेंट असेल तर मॉनिटाइज होईल आणि तुमच्या व्हिडिओज वरती देखील जाहिराती दिसू लागतील व त्याचे तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जर दररोज व्हिडिओ टाकत राहिला आणि तुम्हाला बऱ्यापैकी व्ह्यूज आले तर तुम्ही 50 डॉलर पासून 200 डॉलर पर्यंत महिन्यामध्ये नक्कीच कमाई करू शकता. ( earn money online 2025 )
फेसबुक ( Facebook )
पुढचा मार्ग आहे फेसबुक, मित्रांनो सध्याला फेसबुकच्या माध्यमातून लोक दहा दहा हजार डॉलर्स महिन्यामध्ये कमवत आहेत त्याचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले कदाचित पाहिले असतील.
फेसबुक वरती तुम्ही लॉन्ग व्हिडिओ टाकून इन्स्ट्रीम एड्सच्या माध्यमातून पैसे कमवू शकता, रिल्स व्हिडिओ टाकून ads on reels च्या माध्यमातून पैसे कमवू शकता त्याचबरोबर फोटो किंवा कोणताही टेक्स्ट टाकून देखील बोनस प्रोग्रॅम च्या माध्यमातून पैसे कमवू शकता,
आता फेसबुकने नवीन अपडेट आणलंय त्यानुसार तुम्हाला कंटेंट मोडायझेशन टूल भेटणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहेत. सध्याच्या काळात तुम्हाला वाटत असेल की फेसबुक कोण वापरत पण मित्रांनो माझ्या विश्वास ठेवा सगळ्या भाषांमध्ये फेसबुकला मोठ्या प्रमाणामध्ये रिच आहे. तुम्ही फेसबुक वरती लवकरच व्हायरल होऊ शकता.
हे पण वाचा ..iPhone 16e vs iPhone 16: कोणता iPhone घ्यावा? चला जाणून घेवू संपूर्ण माहिती!
इंस्टाग्राम ( Instagram )
तिसरा मार्ग आहे instagram, मित्रांनो instagram वरून तुम्हाला युट्युब आणि फेसबुक सारखं थेट पैसे कमवता येत नाहीत, यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात त्याच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळे जर तुम्ही आधीच इन्स्टाग्राम वापरत असाल आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे कंटेंट जर बनवत असाल तर तुम्हाला पैसे कमवणे सोपे जाईल,
इंस्टाग्राम वरती तुमच्याकडे 500 पेक्षा जास्त फॉलोवर्स असतील आणि तुमच्या रील्स व्हिडिओला हजारो लाखोंमध्ये व्ह्यूज येत असतील तर अशा बऱ्याचशा बॅटिंग कंपन्या आहेत जे त्यांचा लोगो लावण्यासाठी तुम्हाला व्ह्यूज नुसार पैसे देतात, आणि याचमुळे या रिल्सच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला पाचशे रुपयांपासून हजार रुपये नक्कीच कमवू शकता.
बरेचसे क्रियेटर्स instagram वरती मुव्हीजचे किंवा कोणत्याही प्रकारच्या सिरीयलचे शॉट व्हिडिओ टाकतात आणि त्यानंतर त्याच्या वरती लोगो लावून बक्कळ असा पैसा कमवतात. आणि जर तुम्ही एक मोठा फॅनबेस बनवण्यात यशस्वी झाला तुमच्याकडे लाखोंमध्ये फॉलोवर्स आले तर ब्रँड स्वतःहून तुम्हाला संपर्क साधून तुमच्याकडून जाहिराती करून घेतील आणि त्याचे तुम्हाला लाखोंमध्ये देखील पैसे मिळतील. ( earn money online 2025 )
ब्लॉगिंग ( Blogging )
चौथा मार्ग आहे ब्लॉगिंग, मित्रांनो सध्याच्या काळामध्ये लोक बोलतात की ब्लॉगिंग डेड झाली आहे, पण मित्रांनो असं काही नाहीये तुम्ही जर योग्य प्रकारचा विषय निवडला आणि त्याच्यावरती वेबसाईट बनवून जर तुम्ही आर्टिकल्स लिहिले आणि तुम्ही सोशल मीडियावरून त्याच्यावरती ट्राफिक नेलं तर नक्कीच तुम्ही याच्या माध्यमातून मोठा पैसा कमवू शकता आणि लोक कमवत आहेत, याच्यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या ब्लॉग किंवा त्या वेबसाईटला एडसन्स थ्रू मॉनिटाइज करावे लागेल त्यानंतर तुमच्या त्या आर्टिकल्स वरती जाहिरात दिसू लागतात आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. earn money online 2025.
हे पण वाचा.. आधार कार्डवर असे मिळेल वैयक्तिक आणि व्यवसायिक कर्ज! PMEGP योजनेबद्दल सविस्तर माहिती
अफिलीएट मार्केटिंग ( affiliate marketing )
आता पुढचा मार्ग आहे affiliate marketing.. मित्रांनो एक्सीडेंट मार्केटिंग सध्याच्या काळामध्ये एक मोठा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून पाहिला जातो हा एक बिजनेस देखील आहे, तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती दुसऱ्या कंपनीचे प्रॉडक्ट तुमच्या लिंक थ्रू खपवलं तर त्याचे तुम्हाला कमिशन म्हणून पैसे मिळतात.
आणि प्रॉडक्ट खपवण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या सोशल मीडिया ॲप्स वरती त्या रिलेटेड कन्टेन्ट बनवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कुठेही ती लिंक शेअर करून लोकांना ते प्रॉडक्ट खरेदी करायला सांगायचा आहे तुमच्या लिंक थ्रू लोकांनी प्रोडक्ट खरेदी केलं तर तुम्हाला त्याचं ठरलेलं कमिशन तुमच्या एफिलेट अकाउंट मध्ये भेटून जाईल आणि नंतर तुम्ही ते तुमच्या बँक अकाउंट मध्ये देखील घेऊ शकता. Broker accounts, e-commerce website या सगळ्यांवरती एफिलेट मार्केटिंग काम करतं. ( earn money online 2025 )
या व्हिडिओ मध्ये आपण 5 मार्गांबद्दल चर्चा केली आहे, याच्या पेक्षा देखील जास्त मार्ग आहेत, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये नक्की सांगेल, या पाच मार्गांपैकी कोणताही मार्ग तुम्हाला आवडला असेल तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही सर्च करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच टिप्स आणि ट्रिक साठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.