आधार कार्डवर असे मिळेल वैयक्तिक आणि व्यवसायिक कर्ज! PMEGP योजनेबद्दल सविस्तर माहिती

Aadhar Card loan PMEGP

आजच्या काळात वैयक्तिक किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळवणे अधिक सुलभ झाले आहे, आधार कार्डच्या सहाय्याने तुम्ही जलद कर्ज घेऊ शकतात. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी आधार कार्डच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया स्वीकारली आहे, त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद आणि सोपी झालीये. विशेषतः PMEGP (प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम) योजनेच्या माध्यमातून कोणतंही तारण न ठेवता मोठ्या रकमेचे कर्ज मिळवता येते.

आधार कार्डवर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?

जर तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक गरजेसाठी कर्ज घ्यायचे असेल, तर आधार कार्डाच्या मदतीने ही प्रक्रिया सहज होऊ शकते. बहुतांश बँका आणि फायनान्स कंपन्या आधार कार्डला अधिकृत ओळखपत्र मानतात आणि यामुळे ई-केवायसीच्या माध्यमातून त्वरित कर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते.

PMEGP योजनेसाठी कोण पात्र आहे?

वय: 21 ते 60 वर्ष असले पाहिजे.

कमीत कमी मासिक उत्पन्न: ₹15,000 ते ₹20,000 (बँकेनुसार वेगवेगळे असू शकते) असले पाहिजे.

क्रेडिट स्कोर: 700 किंवा त्याहून अधिक असणं गरजेच आहे.

कामाचा अनुभव: नोकरदारांसाठी किमान 6 महिने आणि व्यवसायासाठी 1 वर्षाचा अनुभव असलाच पाहिजे.

लोन मिळवण्याची प्रक्रिया

1. संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या.


2. “Apply Now” वर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करा.


3. आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि बँक स्टेटमेंट अपलोड करा त्यानंतर.


4. तुमच्या क्रेडिट स्कोर आणि उत्पन्नाच्या आधारे बँक तुमचा अर्ज मंजूर करेल.


5. मंजुरी मिळाल्यावर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

हे पण वाचा .. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठे बदल – हजारो महिलांना फटका

कोणत्या बँका आधार कार्डवर वैयक्तिक कर्ज देतात?

SBI, ICICI, HDFC, Axis Bank, Tata Capital, Bajaj Finance, आणि Paytm Bank सारख्या अनेक वित्तीय संस्था आधार कार्डच्या आधारे कर्ज देतात.

PMEGP योजनेद्वारे व्यवसायासाठी कर्ज कसे घ्यावे?

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर PMEGP (प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम) ही एक उत्तम संधी ठरू शकते. या योजनेअंतर्गत सरकार ₹50 लाखांपर्यंतचे कर्ज देतंय आणि त्यावर 15% ते 35% पर्यंत सबसिडी देखील मिळू शकते.

कोण पात्र आहे?

वय: किमान 18 वर्ष असणं गरजेचं आहे.

शैक्षणिक पात्रता: व्यवसायाच्या प्रकारानुसार, काही क्षेत्रांसाठी किमान 8वी पास असणे आवश्यक आहे.

व्यवसायाचा प्रकार: उत्पादन, सेवा, कृषी, ट्रेडिंग यांसारख्या विविध क्षेत्रांना पात्रता आहे.

इतर पात्रता: स्वयं-सहायता गट, सहकारी संस्था, ट्रस्ट आणि सोसायट्याही या कर्जासाठी अर्ज करू शकतात.

PMEGP लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड आणि पॅन कार्ड

बँक स्टेटमेंट (शेवटच्या 6 महिन्यांचे)

व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (बिझनेस प्लॅन)

पासपोर्ट साईज फोटो

शैक्षणिक प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)

PMEGP लोन मिळवण्याची प्रक्रिया

1. अधिकृत वेबसाइट www.kviconline.gov.in वर भेट द्या.


2. PMEGP योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा.


3. तुमचा व्यवसायाचा प्रकल्प अहवाल अपलोड करा.


4. बँक तुमची पात्रता आणि दस्तऐवज तपासेल.


5. मंजुरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

व्याज दर आणि परतफेडीची मुदत काय आहे?

व्याज दर: 11% ते 12% (बँकेनुसार बदलू शकतो)

परतफेडीची मुदत: 3 ते 7 वर्षे

सरकारी सबसिडी: 15% ते 35% (शहरी आणि ग्रामीण भागानुसार फरक) आहे.

व्यवसायासाठी आधार कार्डवर कुठे कर्ज मिळेल?

PMEGP अंतर्गत: सर्व सरकारी आणि खासगी बँका

MSME लोन अंतर्गत: SBI, HDFC, ICICI, Bank of Baroda

NBFC कंपन्यांद्वारे: Bajaj Finance, Tata Capital, Fullerton India

जर तुम्हाला जलद आणि सोपे कर्ज हवे असेल, तर आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक किंवा व्यवसायासाठी कर्ज घेणे उत्तम पर्याय आहे. PMEGP योजना खासकरून नव्या व्यवसायांना मदत करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे आणि त्याचा लाभ घेऊन अनेक उद्योजक यशस्वी झाले आहेत.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आजच बँक किंवा NBFC मध्ये ऑनलाइन अर्ज करा आणि तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *