Kamali Lakshmi Nivas : झी मराठी वाहिनीवरील कमळी लक्ष्मी निवास या दोन्ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. घराघरात पोहोचलेल्या या कथांमधील पात्रे, त्यांची भावनिक नाती आणि सतत येणारे नाट्यमय वळण यामुळे प्रेक्षक या मालिकांशी घट्ट जोडले गेले आहेत. आता संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मालिकांचा विशेष महासंगम घडणार असून, त्यात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवास हे आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटताना दिसतात. त्यांच्या कुटुंबातील भावना, सिद्धू, जान्हवी, जयंत आणि व्येंकी ही पात्रे नेहमीच कथेत रंगत भरताना दिसतात. भावना आणि सिद्धू यांचं नातं प्रेक्षकांना भावणारे आहे. एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही त्यांची ओळख बनली आहे. दुसरीकडे, जयंतच्या जाचाला कंटाळून जान्हवीने मोठा निर्णय घेत घर सोडलं असून, ती सध्या तिच्या मित्राकडे दुसऱ्या नावाने राहत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे लक्ष्मी निवासची कथा अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
तर ‘कमळी’ मालिकेतही संघर्ष कमी नाही. गावातून मुंबईत शिक्षणासाठी आलेली कमळी अनेक अडचणींना सामोरी जाते. तिच्या शहरात येण्याला आईचा विरोध असला तरीही कमळी आपल्या स्वप्नांसाठी ठाम राहते. मात्र कॉलेजमध्ये अनिका, तिची आई आणि कामिनी आजी सतत तिच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तरीही ऋषी, निंगी आणि अन्नपूर्णा आजी यांच्या आधारामुळे कमळी प्रत्येक संकटातून मार्ग काढते.
आता Kamali Lakshmi Nivas या महासंगमात दोन्ही मालिकांच्या कथांना नवे वळण मिळणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये लक्ष्मी निवासमधील रवी आणि कमळी मालिकेतील कामिनी एकत्र येऊन एक धोकादायक कट रचताना दिसतात. एका शाळेला बंद करण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होतो. शाळा बंद असल्याचा फलक पाहून कमळी आत जाण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला रोखण्यात येतं. या गोंधळात ती पडणार तेवढ्यात सिद्धू तिला सावरतो आणि शाळा वाचवण्याचा निर्धार जाहीर करतो.
यानंतर अन्नपूर्णा आजी, लक्ष्मी, ऋषी हे सर्वजण एकत्र येत अन्यायाविरुद्ध उभे राहतात. बॅरिकेट्स तोडून ते आत प्रवेश करतात आणि मराठीसाठी, शिक्षणासाठी एकजुटीचा संदेश देतात. “मराठीचा विषय असेल, तर एकत्र येणं गरजेचं आहे,” असे कमळीचे शब्द या महासंगमाची भावना स्पष्ट करतात.
हे पण वाचा.. ‘पारू’मधील दामिनी उर्फ श्रृतकीर्ती सावंतची भावनिक पोस्ट; २०२५च्या आठवणी, २०२६साठी नवी उमेद
एकूणच, Kamali Lakshmi Nivas महासंगम प्रेक्षकांसाठी खास ठरणार असून, या एकत्रित लढ्यात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. वल्लरी विराजचं दमदार कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ कधी आणि किती वाजता पाहायला मिळणार?









