ADVERTISEMENT

तारीख निश्चित! ‘काजळमाया’ मालिकेत झळकणार रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर; ‘अबोली’ संपणार का?

kajalmaya star pravah abhinetri telecast date : 'स्टार प्रवाह'ची नवी मालिका "Kajalmaya" २७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर यांची प्रमुख भूमिका असलेली ही हॉरर मालिका रात्री ११ वाजता प्रसारित होणार असून त्यामुळे 'अबोली' संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
kajalmaya star pravah abhinetri telecast date

kajalmaya star pravah abhinetri telecast date : मराठी टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनव्या मालिका घेऊन येणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक वेगळीच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे “काजळमाया“. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आणि क्षणार्धात तो चर्चेचा विषय ठरला. या प्रोमोमुळे मालिकेतील नायक म्हणून अभिनेता अक्षय केळकर झळकणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र मुख्य अभिनेत्री कोण असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमधून अखेर यावर पडदा उठला आहे. काजळमाया मध्ये अभिनेत्री रुची जाईल ही पर्णिका नावाच्या चेटकीणीची भूमिका साकारणार आहे. पर्णिका ही रूपवान, पण अतिशय स्वार्थी आणि निर्दयी चेटकीण असल्याचं कथानकातून दिसून येतं. विशेष म्हणजे हीच भूमिका रुचीच्या मालिकाविश्वातील पदार्पणाची सुरुवात ठरणार आहे.

याच मालिकेत आणखी एक लोकप्रिय चेहरा झळकणार आहे – वैष्णवी कल्याणकर. ‘देवमाणूस’ मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झालेली वैष्णवी काजळमायाच्या कथानकात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे आरुष (अक्षय केळकर) या नायकाला पर्णिकेचे भास होत असतात, पण प्रत्येकवेळी वैष्णवी त्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढताना दिसते.

हे पण वाचा.. “दिवाळीचा खरा फराळ! निलेश–भाऊची जोडी आणणार हास्याची आतषबाजी, ‘Dhinchyak Diwali 2025’ मध्ये करणार धम्माल”

“काजळमाया” केव्हा सुरू होणार?
ही हॉरर आणि रहस्यमय मालिका २७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री ११ वाजता या मालिकेचं प्रसारण होईल. सध्या या वेळेत अबोली ही मालिका दाखवली जाते. त्यामुळे Kajalmaya सुरू होताच अबोली मालिकेचा समारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रोमो आल्यापासूनच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मालिकेचं कौतुक करत “आता अबोली संपणार” अशी कमेंटही केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत काजळमायाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. ““लग्न नाही, कुटुंब नाही…” नेटकऱ्याच्या मेसेजवर जुई गडकरीची संतप्त प्रतिक्रिया

kajalmaya star pravah abhinetri telecast date