ADVERTISEMENT

Jui Gadkari :”रात्री दोन वाजता फोन करायचा असेल तर कोणाला करते कॉल?” यावर काय म्हणाली अभिनेत्री..

Friendship Day च्या निमित्ताने अभिनेत्री Jui Gadkari हिने तिच्या मैत्रीबद्दल आणि भावंडांसोबतच्या घट्ट नात्याबद्दल दिलखुलास अनुभव शेअर केला आहे. "माझा 2 AM Friend मीच आहे", या खास उत्तराने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिच्या सच्च्या मैत्रीची आणि प्रामाणिक नात्यांची ही गोष्ट नक्की वाचाच.
Jui Gadkari

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे हा दिवस प्रत्येकाच्या मैत्रीच्या नात्याला उजाळा देणारा असतो. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव, जुने फोटो आणि आठवणींचे पिटारे उघडणारा हा दिवस कलाकारांनाही वेगळा वाटतो. याच निमित्ताने ‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Jui Gadkari हिने तिच्या खास मैत्रीविषयी काही गोष्टी शेअर केल्या आहेत, ज्या तिच्या चाहत्यांना नक्कीच भावतील.

एका मुलाखतीत जेव्हा Jui Gadkari ला विचारण्यात आलं की, “रात्री दोन वाजता जर गरज पडली तर तू पहिला फोन कोणाला करशील?”, तेव्हा जुईने फारच वेगळं आणि थेट उत्तर दिलं. “माझा रात्री २ वाजताचा मित्र किंवा मैत्रीण असं कोणी नाही. मीच माझी रात्री २ वाजताची मैत्रीण आहे,” असं उत्तर देत तिने सर्वांचं लक्ष वेधलं.

Jui Gadkari पुढे म्हणाली, “मी फार कमी लोकांशी संवाद साधते. काही गोष्टी मनातच ठेवते आणि स्वतःच त्यातून मार्ग काढते. माझ्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती नाही की जिला मी मध्यरात्री फोन करू शकेन. पण हो, माझे भावंडं मात्र अपवाद आहेत. माझ्या बहिणी-भावांशी माझं नातं इतकं घट्ट आहे की आम्ही कधीही, कोणत्याही वेळी एकमेकांशी संवाद साधतो. मग तो सकाळचा वेळ असो की मध्यरात्र – आम्ही एकमेकांना मेसेज किंवा कॉल करतच असतो. त्यामुळे माझे खरे ‘२ एएम फ्रेण्डस’ हे माझी भावंडंच आहेत.”

हे पण वाचा..‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Vallari Viraj आणि आलापिनी निसळ पुन्हा एकत्र? नवा प्रोजेक्ट चर्चेत

Jui Gadkari ने तिच्या पूर्वीच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की अभिनेता प्रसाद लिमये हा तिचा अतिशय जवळचा मित्र आहे. जुई जेव्हा शारीरिकदृष्ट्या अत्यंत आजारी होती, तेव्हा प्रसाद आणि त्याच्या भावाने तिला मानसिक आधार दिला होता, असा अनुभवही तिने शेअर केला आहे. या मैत्रीने तिला त्या कठीण काळातून बाहेर येण्यासाठी बळ दिलं, असं ती म्हणते.

याशिवाय, ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या सेटवरही तिचा एक घट्ट मैत्रीचा ग्रुप आहे. मालिकेमध्ये जरी प्रिया ही सायलीच्या विरोधातली भूमिका साकारत असली तरी प्रत्यक्षात मात्र जुई आणि Priyanka Tendolkar खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. प्रियांकानेही एका मुलाखतीत सांगितले होते की सोशल मीडियावरील एखाद्या गोष्टीबाबत शंका असल्यास किंवा त्यामागचं सत्य जाणून घ्यायचं असल्यास ती नेहमी जुईकडेच जाते, कारण जुईचा त्या गोष्टीवर सखोल अभ्यास असतो.

या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होतं की जुई गडकरी ही मैत्री या नात्याबाबत खूप प्रामाणिक आहे. ती केवळ चकाकत्या पार्टीज किंवा फोटोसाठी मैत्री करत नाही, तर गरजेला धावून येणाऱ्या नात्यांनाच ती खरी मैत्री मानते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा हा विशेष गुण तिला इतरांपेक्षा वेगळी ओळख देतो.

हे पण वाचा..Paaru fame Sanjana Kale: ‘बहरला हा मधुमास’वर मोहक डान्स; व्हिडीओ पाहून चाहते घायाळ!

Friendship Day च्या निमित्ताने जुई गडकरीने तिच्या खर्‍या मैत्रीचे आणि भावंडांसोबतच्या घट्ट नात्याचे केलेले हे मनमोकळं वर्णन तिच्या चाहत्यांच्या मनाला भिडणारे ठरले आहे. तिच्या या विचारांमधून सच्च्या आणि निरपेक्ष नात्यांची महत्त्वता अधोरेखित होते.