आता अधिक रोमांचक होणार IPL 2025! यंदाच्या हंगामात पाहायला मिळणार ‘पहिल्यांदाच’ घडणाऱ्या अनेक गोष्टी

IPL 2025

IPL 2025 हंगामात प्रेक्षकांना अनेक नव्या नियमांचा आणि पहिल्यांदाच होणाऱ्या बदलांचा अनुभव येणार आहे. यंदा मॅच फीपासून DRS पर्यंत, बऱ्याच गोष्टी प्रथमच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ‘इंडिया का त्योहार’ असलेला IPL अधिक रोमांचक होणार आहे!

भारतात क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नाही, तर एक उत्सव आहे. आणि या उत्सवाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, ज्याला ‘इंडिया का त्योहार’ असंही म्हणतात.

या लीगचा १८वा हंगाम म्हणजे IPL 2025, येत्या २२ मार्चपासून थाटामाटात सुरू होणार आहे. या वर्षीचं IPL आणखी खास असणार आहे कारण यंदाच्या हंगामात अनेक नवे बदल, नियम आणि पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे.

IPL 2025 मध्ये नवे काय घडणार?

बीसीसीआयने (BCCI) यंदाच्या हंगामासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, जे लीगला आणखी रोमांचक बनवतील. पहिल्यांदाच तीन नवे नियम लागू होणार असून, दोन नव्या चेहऱ्यांना कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे.

पहिल्यांदाच खेळाडूंना मिळणार ‘मॅच फी’

आतापर्यंत IPL मध्ये खेळाडूंना त्यांच्या लिलावात मिळालेल्या रकमेनुसारच मोबदला दिला जात होता. मात्र IPL 2025 पासून यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक सामना खेळण्यासाठी १२ सदस्यांच्या स्क्वॉडमधील खेळाडूंना स्वतंत्र मॅच फी दिली जाणार आहे. प्रत्येकाला प्रत्येकी ७.५ लाख रुपये फी दिली जाईल. मात्र हे केवळ त्या खेळाडूंना लागू असेल जे टीम शीटमध्ये असतील; जे प्लेइंग इलेव्हन किंवा सबस्टीट्यूट म्हणून सहभागी असतील. हा निर्णय विशेषतः त्या खेळाडूंना आर्थिक स्थैर्य देणारा ठरणार आहे, जे कमी रकमेच्या बोलीवर लिलावात खरेदी झाले होते.

वाइड आणि नो-बॉलवर मिळणार DRS सुविधा

आता वाइड बॉल आणि नो-बॉलसंदर्भातील निर्णयातही DRS (डिसिजन रिव्ह्यू सिस्टम) वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता बॉल ट्रॅकिंग आणि हॉक आय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाइड आणि उंचीच्या सीमारेषेबाबतचे निर्णय अधिक अचूकपणे घेतले जातील. यापूर्वी हे तंत्रज्ञान फक्त बॉलच्या ओव्हर द वेस्ट आणि नो-बॉलसाठी वापरले जात होते. पण आता ते वाइड बॉलच्या निर्णयांमध्येही वापरले जाईल. यामुळे अंपायरिंगच्या निर्णयात पारदर्शकता वाढेल आणि खेळाडूंना अधिक न्याय मिळेल.

हे पण वाचा..IPL 2025 CSK Tickets विक्रीला प्रचंड प्रतिसाद; पहिल्याच सामन्यासाठी तिकिटे काही मिनिटांतच ‘सोल्ड आउट’

तिन्ही बॉलने खेळला जाणार सामना!

IPL 2025 च्या डे-नाईट सामन्यांमध्ये एका नव्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. यंदा प्रत्येकी एक सामना तिन्ही वेगवेगळ्या बॉलने पूर्ण केला जाईल. पहिल्या डावात एक बॉल वापरण्यात येईल आणि दुसऱ्या डावात दोन वेगवेगळ्या बॉलचा वापर होणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात ११व्या षटकानंतर एक नवीन बॉल वापरण्यात येईल, जेणेकरून ओस (Dew) मुळे बॉलवर होणारा परिणाम कमी करता येईल. तसेच, कोविड-१९ नंतर बंदी घालण्यात आलेल्या ‘सलाइवा’ चा वापर पुन्हा एकदा परवानगीने सुरू होणार आहे, ज्यामुळे बॉलवर चमक राखण्यात मदत होणार आहे.

नव्या कर्णधारांची एंट्री

यंदाच्या हंगामात दोन नवीन कर्णधार IPL मध्ये पदार्पण करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने पहिल्यांदाच रजत पाटीदारला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यानंतर आता पाटीदार संघाचं नेतृत्त्व करताना दिसेल. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघाने रियान पराग याच्याकडे सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी कर्णधारपद दिलं आहे. रियान पराग यासाठी ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वगुणांची खरी कसोटी IPL 2025 मध्ये होणार आहे.

IPL 2025: एक वेगळा अनुभव

IPL हा नेहमीच नावीन्यपूर्णतेसाठी ओळखला जातो. गेल्या काही हंगामांमध्ये इम्पॅक्ट प्लेयर, स्ट्रॅटेजिक टाइमआउट, आणि डिजिटल इनोव्हेशन्स या सर्व गोष्टींनी क्रिकेटच्या नियमांना एक वेगळं वळण दिलं आहे. आता यंदाच्या बदलांमुळे हा हंगाम आणखी उत्कंठावर्धक होणार आहे.

IPL 2025 हे केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर तांत्रिक आणि नियमांच्या पातळीवरही ऐतिहासिक ठरणार आहे. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हे पर्व म्हणजे एक पर्वणीच आहे. आता पाहावं लागेल की, या नव्या बदलांमुळे IPL अधिक रोमांचक ठरतं का!

हे पण वाचा..IPL 2025 टीम्सच्या किंमती : मुंबई इंडियन्सची किंमत ऐकून उडतील तुमचेही होश!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *