iPhone 16e vs iPhone 16: कोणता iPhone घ्यावा? जाणून घ्या संपूर्ण एक्सप्लोरर!
Table of Contents
iPhone 16e vs iPhone 16 – हे दोन्ही नवीन iPhone मॉडेल्समध्ये काय वेगळ आहे आणि एकमेकांपेक्षा ते कसे वेगळे आहेत? डिझाइन, डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि किंमत यासंदर्भातील सविस्तर माहिती समजून घ्या!
Apple ने आपल्या iPhone 16 सिरीजमध्ये एक नवीन आणि बजेट-फ्रेंडली मॉडेल लाँच केले आहे.” – iPhone 16e! हा iPhone SE 3 “ची नवीन आणि सुधारित आवृत्ती असून तो iPhone 16 पेक्षा परवडणार मॉडेल आहे.
परंतु, जर आपण नवीन iPhone घेण्याचा विचार करत असताल तर तुम्हाला हमकास प्रश्न पडतो – iPhone 16e vs iPhone 16, यातील सर्वात चांगला कोणता? कोणता विकत घ्यावा? आज आपण या दोन्ही पर्यायांची तुलना एक्सप्लोर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला बजेट आणि गरजेनुसार आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर योग्य पर्याय निवडने सोपे होईल !
iPhone 16e vs iPhone 16 चे डिझाइन
iPhone 16e आणि iPhone 16 च्या डिझाइनमध्ये काही विशेष फरक आहेत.
० iPhone 16e मध्ये iPhone 14 मधील जुने Notch डिझाइन पाहिला मिळते, जे आपल्याला iPhone 14 मध्ये जे शेवटचा वापर करण्यात आले होते.
० iPhone 16 यामध्ये आधुनिक Dynamic Island आहे त्यामुळे अधिक प्रभावी UI अनुभव वापरकर्ताला मिळतो”
० iPhone 16e मध्ये आपल्याला सिंगल 48MP कॅमेरा पाहायला मिळतो, तर iPhone 16 मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे.
० iPhone 16e केवळ दोनच रंगांमध्ये (Black आणि White) उपलब्ध आहे, आणि iPhone 16 मध्ये Teal, Ultramarine आणि Pink यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
हे पण वाचा..दमदार बॅटरी आणि अनेक AI फिचर्ससह सुसज्ज Vivo V50 लॉन्च झाला आहे जाणून घ्या किंमत!
iPhone 16e vs iPhone 16: डिस्प्ले
० दोन्ही iPhones मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळतं आहे.
० iPhone 16e मध्ये Notch असल्या कारणाने Dynamic Island फीचर मिळत नाही.
० iPhone 16 च्या डिस्प्लेची ब्राइटनेस क्षमता 1600 nits इतकी आहे, आणि iPhone 16e च्या डिस्प्लेची ब्राइटनेस क्षमता फक्त 1200 nits एवढीच आहे.
डिस्प्लेच्या बाबतीत iPhone 16 अधिक चांगला पर्याय असल्याचे दिसून येते, कारण त्यामध्ये Dynamic Island आणि अधिक ब्राइटनेस आहे.
iPhone 16e vs iPhone 16: प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
० iPhone 16e आणि iPhone 16 मध्ये नवीन A18 चिप आहे पण iPhone 16e मध्ये 5-core GPU असून iPhone 16 मध्ये 6-core GPU आहे.
० iPhone 16e मध्ये Apple च्या C1 5G मोडेममध्ये असून पण Ultra Wideband सपोर्ट नाही
० दोन्ही मॉडेल्स हे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत
० iPhone 16e मध्ये 8GB RAM असल्याने Apple Intelligence फीचर्स याला सपोर्ट होते.
परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर, iPhone 16 उत्कृष्ट आहे.कारण त्यामध्ये 6core GPU आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहे.
iPhone 16e vs iPhone 16: बॅटरी आणि चार्जिंग
० iPhone 16e मध्ये आपल्याला 26 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक बॅकअप मिळतो, आणि iPhone 16 मध्ये फक्त 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक बॅकअप मिळतो.
० iPhone 16e मध्ये MagSafe सपोर्ट नाही, पण 7.2W Qi वायरलेस चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे.
जर आपल्याला अधिक बॅटरी बॅकअप हवा असेल, तर iPhone 16e हा चांगला पर्याय आहे.डिझाइनच्या बाबतीमध्ये, iPhone 16 अधिक प्रीमियम आणि मॉडर्न वाटतो, तर iPhone 16e बजेट-फ्रेंडली पर्याय आहे.
iPhone 16e vs iPhone 16: कॅमेरा
० iPhone 16e मध्ये सिंगल 48MP कॅमेरा आहे, आणि iPhone 16 मध्ये ड्युअल 48MP + 12MP कॅमेरा दिलेला आहे.
० iPhone 16e मध्ये 2x डिजिटल झूम पर्याय आहे, पण अल्ट्रा-वाइड लेन्स त्यात दिलेली नाही.
० iPhone 16 मध्ये नवीन Photographic Styles, Next-Gen Portraits, Macro Photography आणि Spatial Video सारखी फीचर्स दिले आहेत, तर iPhone 16e मध्ये हे फीचर्स देण्नायात आले नाहीत. जर अधिक कॅमेरा फीचर्स हवे असतील, तर iPhone 16 हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
iPhone 16e vs iPhone 16 ची किंमत:
० iPhone 16e – ₹59,900 पासून सुरू
० iPhone 16 – ₹79,900 पासून सुरू
जर तुम्ही परवडणारा आणि चांगली बॅटरी लाइफ असलेला नवीन iPhone शोधत असाल, तर iPhone 16e हा योग्य निवड ठरणार आहे परंतु,जास्त चांगला डिस्प्ले, कॅमेरा आणि परफॉर्मन्स हवा असल्यास, iPhone 16 हा उत्तम पर्याय ठरू शकतो.शेवटी निवड तुमच्या बजेट आणि गरजांवर अवलंबून आहे!