Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: कोणती बाईक अधिक चांगली?

hornet

Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 200 4V या दोन्ही बाइक्समध्ये कोणती अधिक दमदार ? जाणून घ्या  किंमती, फीचर्स आणि परफॉर्मन्स यांची संपूर्ण माहिती !

भारतीय बाजारपेठेत Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 200 4V या दोन दमदार स्पोर्ट्स बाइक्सच्या चर्चेला उधाण आले आहे Hornet 2.0 ही Honda ची  अलीकडचं आलेली नवीन अपग्रेडेड बाईक असून, ती  2025 वर्षाच्या अनुषंगाने सुधारणा करण्यात आली आहे. तर, Apache RTR 200 4V ही TVS ची पॉवरफुल स्पोर्ट्स बाईक असून विविध फीचर्सने संपूर्ण आहे.

जर तुम्ही Hornet 2.0 vs Apache RTR 200 4V या दोन बाइकच्या पर्यायांमध्ये कोणती निवडावी याचा विचार करत अहात, तर ही एकूण तुलना तुम्हाला योग्य निर्णय आणि निवड करण्यात मदत करेल.

Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: किंमतींची तुलना


Honda Hornet 2.0 ची किंमत ₹1,56,953 एक्स-शोरूम, किंमत आहे, जी एक आकर्षक किंमत मानली जात आहे. तसेच
Apache RTR 200 4V ची किंमत थोडी कमी आहे आणि ती ₹1,47,820 एक्स-शोरूम पासून सुरूवात होते.जर ही किंमत तुमच्या निर्णयाचा मुख्य मापदंड असेल.तर Apache RTR 200 4V स्वस्त पर्याय आहे आणि Hornet 2.0 अधिक चांगल्या विकसित फीचर्स आणि नवीन बदलांसह येते.

Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: फीचर्समधील तुलना


Honda Hornet 2.0 चे मुख्य फीचर्स

नवीन 4.2-इंच TFT डिस्प्ले (Smartphone कनेक्टिव्हिटीसह) वापरकर्त्यांना स्मार्टफोनशी सहज कनेक्ट होण्याची सुविधा या मध्ये मिळते.सहजतेने कॉल आणि संदेश सूचनांसाठी कनेक्ट होण्याची सुलभ अनुभव मिळतो. उदा.ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी (Call आणि SMS अलर्टसाठी) तसेच Type-C  (फास्ट चार्जिंगसाठी) वापरकर्त्यांना वेगवान चार्जिंगचा अनुभव मिळावा म्हणून या बाईक मध्ये चार्जिंग पोर्ट उपलब्ध करून दिला आहे.
त्याचं बरोबर वापरकर्त्याच्या सुरक्षेसाठी या बाईक मध्ये Dual-Channel ABS स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल  हे मुख्य फीचर, ड्रायव्हिंग अनुभव आणखी सुरक्षित आणि आरामदायक बनवतो.

TVS Apache RTR 200 4V चे फीचर्स:

दृष्य चांगली दिसण्यासाठी “LED हेडलाइट्स आणि DRL असे आधुनिक दिवे  दिले आहेत जेणेकरून रात्रीच्या वेळी अंधारात बाईक राईड सुखरूप होते तसेच तीन रायडिंग मोड्स – स्पोर्ट, अर्बन, आणि रेन अनेक रस्त्यांवर उत्तम अनुभव देण्यासाठी  आहेत. त्याचं बरोबर वापरकर्त्याना वाहतूक नियंत्रणासाठीGTT (Glide Through Traffic) टेक्नॉलॉजी या बाईक मध्ये उपलब्ध करून दिली आहे.आणि Adjustable सस्पेन्शन जिथे राइडरला वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या वातावरणात अनुकूलता प्रदान करणे हे या फिचर चे मुख्य काम आहे.

रायडिंग मोड्स किंवा आरामदायक सस्पेन्शनसाठी बाईक हवी असेल तर तुम्ही Apache RTR 200 4V ची निवड करू शकता आणि जर स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक फीचर्स हव असेल तर तुम्हीला Hornet 2.0 हा एक चांगला पर्याय आहे

हे पण वाचा..दमदार इंजिन 70 km मायलेजसह 2025 Hero Splendor Plus 135cc आली बाजारात!

Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: इंजिन आणि परफॉर्मन्स

Honda Hornet 2.0 मध्ये 184.40cc चे सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून ते 17.03 bhp @ 8500 rpm + 15.9 Nm टॉर्क @ 6000 rpm निर्माण करते, ज्यामुळे राइडला उत्तम पॉवर आणि कार्यक्षमता मिळते.

Apache RTR 200 4V मध्ये 197.75cc चे इंजिन दिलं गेलं आहे, जे स्पोर्ट मोडमध्ये 20.5 bhp @ 9000 rpm आणि 17.25 Nm टॉर्क @ 7250 rpm निर्माण करते, त्यामुळे जास्त शक्तिशाली आणि रोमांचक राइडिंग अनुभवायला मिळते.

Honda Hornet 2.0 मध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत.
Slip-and-Assist Clutch सोबत ज्यामुळे गिअर बदलत असताना सहजता आणि चांगलं नियंत्रण मिळत.
Apache RTR 200 4V मध्ये देखील 5-स्पीड गिअरबॉक्स आहेत, परंतु यामध्ये रायडिंग मोड्सचा जास्त फायदा आहे त्यामुळे अनेक रॉड्स वर चांगला परफॉर्मन्स मिळतो

मायलेज आणि राइडिंग अनुभव

Honda Hornet 2.0 सुमारे 45 kmpl पर्यंत मायलेज देते ही बाईक वजनाने हलकी आणि सुंदर डिझाइन तसेच सस्पेन्शन आणि सीटिंग पोझिशनमुळे शहरातील राइडसाठी आरामदायक अनुभव देते.

Apache RTR 200 4V साधारणतः 38-40 kmpl मायलेज देते. स्पोर्टी रायडिंग पोझिशन आणि रायडिंग मोड्सचे फिचर्स असल्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जास्त सुव्यवस्था या  बाईकमध्ये मिळते. तसेच या बाईकचे सस्पेन्शन आणि चांगले टॉर्क रेसिंग अनुभव देते त्यामुळे ही बाईक तरूण मुलांना आकर्षित करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *