ADVERTISEMENT

पुन्हा येणार ‘होम मिनिस्टर’? आदेश बांदेकरांच्या कमबॅकची जोरदार चर्चा!

home minister punha yenar aadesh bandekar comeback marathi show : मराठी प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. झी मराठीच्या कार्यक्रमप्रमुखांनी दिलेल्या सूचक वक्तव्यानंतर आदेश बांदेकर पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
home minister punha yenar aadesh bandekar comeback marathi show

home minister punha yenar aadesh bandekar comeback marathi show : मराठी दूरचित्रवाणी विश्वात काही कार्यक्रम असे आहेत, ज्यांनी केवळ लोकप्रियतेचे विक्रमच मोडले नाहीत, तर प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग बनून गेले. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘होम मिनिस्टर’. अनेक वर्ष घराघरांत पोहोचलेला हा कार्यक्रम आणि त्यातील लाडके ‘भावोजी’ अर्थात आदेश बांदेकर आजही प्रेक्षकांच्या मनात तितक्याच आपुलकीने जिवंत आहेत. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर परतणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

अलीकडेच पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान झी मराठीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पाठारे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले. “दार उघड बये म्हणत भावोजी येणार की आणखी कोणी?” या त्यांच्या सूचक विधानानंतर सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात ‘होम मिनिस्टर’च्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे या चर्चेत आदेश बांदेकर यांचे नाव पुन्हा समोर येत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘होम मिनिस्टर’ नव्या स्वरूपात पण जुनाच आत्मा जपत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या कार्यक्रमाची खरी ताकद म्हणजे घराघरातील साध्या माणसांशी जोडलेली नाळ. आदेश बांदेकर यांनी त्यांच्या सहज, आपुलकीच्या आणि विनोदी शैलीतून महिलांशी तसेच कुटुंबीयांशी साधलेला संवाद प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. त्यामुळेच हा कार्यक्रम फक्त गेम शो न राहता प्रत्येक कुटुंबाचा एक भावनिक भाग बनला होता.

गेल्या काही वर्षांत मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन रिअॅलिटी शो आले, मात्र ‘होम मिनिस्टर’सारखी ओळख फार कमी कार्यक्रमांना मिळाली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या पुनरागमनाच्या चर्चेमुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील महिला प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल आजही मोठे आकर्षण आहे.

दोन वर्षांपूर्वीदेखील या कार्यक्रमाच्या पुनरागमनाबाबत चर्चा रंगली होती. मात्र त्यावेळी अधिकृत घोषणा झाली नव्हती. आता पुन्हा एकदा झी मराठीकडून मिळालेल्या संकेतांमुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या तरी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत, प्रसारणाची वेळ किंवा नेमकी तारीख याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र ऑगस्ट महिन्याच्या आसपास यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा.. मोठमोठे होर्डिंग्स ते सी-लिंकवर ‘I Love You’…; अखेर समरने स्वानंदीसमोर व्यक्त केलं प्रेम, रोमँटिक ट्विस्टने चाहते खुश!

home minister punha yenar aadesh bandekar comeback marathi show

दरम्यान, आदेश बांदेकर सध्या एका कार्यक्रमानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. तरीही ‘भावोजी’ पुन्हा एकदा घराघरांत पोहोचणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मराठी मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा ‘दार उघड बये’चा आवाज घुमणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली’मधील ऑनस्क्रीन वाद, पण ऑफस्क्रीन जिव्हाळा! प्राप्ती रेडकरने सांगितलं सुलेखा तळवलकर यांच्याबद्दल खास