gt vs srh Dream11 Prediction, IPL 2025: हैदराबादच्या भूमीवर आज रंगणार टी-20 थरार; कोण मारणार बाजी?

gt vs srh

सनरायझर्सच्या भूमीवर आज वादळ येणार – एकीकडे आत्मविश्वास गमावलेला हैदराबाद, तर दुसरीकडे जोरात तुफान घेऊन आलेला गुजरात! gt vs srh, विजयासाठी रणनीती कोणती? कोण मिळवणार विजय आजचा सामना ठरेल ‘कमबॅक की क्लीनस्वीप’!

हैदराबाद – आयपीएल 2025 मध्ये gt vs srh आज संध्याकाळी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात १९वा सामना रंगणार आहे. आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता, SRH संघ जरी साखळीच्या तळात असला, तरी घरच्या मैदानावर त्यांना पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा फॉर्म सध्या जबरदस्त असून ते साखळीच्या पहिल्या चारमध्ये कायम आहेत.

हैदराबादची अडचणीत भरकटलेली झेप

SRH संघाची हंगामाची सुरुवात दमदार झाली होती. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी २८६ धावांचा डोंगर उभारून सामना जिंकला. पण त्यानंतरचा प्रवास खडतर ठरला. सलग तीन पराभवांनी संघाचं मनोधैर्य डळमळीत केलं आहे. विशेषतः कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना तब्बल ८० धावांनी हार पत्करावी लागली. त्या सामन्यात हेनरिक क्लासेनने ३३ धावांची झुंज दिली, पण ती पुरेशी ठरली नाही.

‘ट्रॅव्हिशेक’ म्हणजे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा जोडीची क्रॅश लँडिंग

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही SRH ची आक्रमक सलामीची जोडी यंदाच्या मोसमात अद्याप अपेक्षित कामगिरी करू शकलेली नाही. मागील हंगामात विरोधकांवर धडाकेबाज फटकेबाजीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या या जोडीला यंदा फारसं यश मिळालेलं नाही. माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने या बाबत चिंता व्यक्त केली असून, सलग तीन पराभवांनंतर संघासाठी सावरणं कठीण ठरू शकतं असं तो म्हणाला. तरीही कर्णधार पॅट कमिन्सच्या स्पष्ट विधानानुसार, संघ आपली आक्रमक धोरणशैली कायम ठेवणार आहे.

हे पण वाचा ..Jasmin Walia ची IPLमध्ये एंट्री, हार्दिक पांड्याच्या मैत्रिणीची चर्चा जोरात!

गुजरात टायटन्सची साखळीतील स्थिर वाटचाल

दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामन्यांत दोन विजय मिळवले असून, मागील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जोस बटलरने त्या सामन्यात ७३ धावा ठोकून सामन्याचा रुखच बदलून टाकला होता.

gt vs srh सामन्यापूर्वीची आकडेवारी – कोण वरचढ?

आयपीएलमध्ये gt vs srh यांच्यात आतापर्यंत ५ वेळा सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ३ सामन्यांमध्ये गुजरातने विजय मिळवला, तर हैदराबादला केवळ १ सामन्यात यश मिळालं आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे सांख्यिकीदृष्ट्या गुजरात टायटन्स सरस आहेत.

राजीव गांधी स्टेडियमवरील SRH चा रेकॉर्ड

SRH ला घरच्या मैदानाचा मोठा फायदा होऊ शकतो. हैदराबादमध्ये त्यांनी आतापर्यंत ५९ सामने खेळले असून, त्यापैकी ३६ सामने जिंकले आहेत. २२ सामन्यांत पराभव आणि १ सामना बरोबरीत राहिला आहे. विशेष म्हणजे, याच मैदानावर त्यांनी गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावांचा सर्वात मोठा स्कोअर नोंदवला होता.

gt vs srh : महत्त्वाचे खेळाडू आणि Dream11 चे संभाव्य पर्याय

विकेटकीपर – हेनरिक क्लासेन (SRH), जोस बटलर (GT), इशान किशन (GT)
फलंदाज – शुभमन गिल (GT), ट्रॅव्हिस हेड (SRH) [उप-कर्णधार], साई सुदर्शन (GT) [कर्णधार], शर्फेन रदरफोर्ड (SRH)
अष्टपैलू – अभिषेक शर्मा (SRH), के नितीश रेड्डी (SRH)

gt vs srh Dream11 साठी टॉप पिक्स:

जोस बटलर (GT): मागील सामन्यातील ७३ धावांची खेळी आणि एकूण फॉर्म पाहता, तो कोणत्याही फॅन्टसी संघाचा स्टार ठरू शकतो.

शुभमन गिल (GT): ४ डावांत १६६ धावा, १०१ चा सर्वोच्च स्कोअर – त्याचं सातत्य आणि स्ट्राइक रेट नजरेत ठेवण्यासारखा आहे.

हेनरिक क्लासेन (SRH): SRH च्या अडचणीच्या काळातही त्याने धावांचे योगदान दिले आहे.

भुवनेश्वर कुमार (SRH): गुजरातविरुद्धच्या सामन्यांत ७ विकेट्स घेतलेत, त्याची ५/३० ची सर्वोत्तम कामगिरी लक्षात घ्या.

gt vs srh यांच्यात सर्वाधिक धावा आणि बळी

SRH आणि GT यांच्यात सर्वाधिक धावा आणि बळी
फलंदाजडावेधावासरासरीस्ट्राइक रेटसर्वोच्च स्कोर
शुभमन गिल (GT)416641.50139.49101
अभिषेक शर्मा (SRH)414135.25142.4265
साई सुदर्शन (GT)310334.33127.1647

गोलंदाजडावेविकेट्सइकॉनोमीसरासरीसर्वोत्तम
भुवनेश्वर कुमार (SRH)477.9318.145/30
मोहम्‍मद शमी (GT)377.6613.144/21
मोहित शर्मा (GT)276.627.574/28

नजर ठेवा या सामन्यावर!

SRH साठी हा सामना केवळ आणखी एक मॅच नाही, तर आत्मविश्वास पुनर्स्थापन करण्याची संधी आहे. ट्रॅव्हिशेक जोडीला चाललं तर घरच्या चाहत्यांपुढे SRH जोरदार पुनरागमन करू शकतो. पण, गुजरात टायटन्सची एकसंधता आणि फॉर्म पाहता, सामन्याचं पारडं कुणाकडे झुकणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Dream11 प्रेमींसाठी gt vs srh हा सामना महत्त्वाचा असून, योग्य खेळाडूंची निवड विजयात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आकडेवारी, फॉर्म आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन तुमचं Dream11 तयार करा आणि आनंद घ्या या थरारक संध्याकाळीचा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *