सध्या लाखो करदाते आपल्या उत्पन्नावर कर वाचवण्यासाठी विविध मार्ग शोधत आहेत. मात्र, कर बचतीसाठी केवळ गुंतवणूक किंवा खर्च नियोजन पुरेसे नाही, तर ३१ मार्चपूर्वी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. जर तुम्ही हे वेळेत केले नाही, तर मोठ्या प्रमाणावर कर भरण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनावरही होऊ शकतो.
Table of Contents
१ एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम TAX
वित्तीय वर्ष २०२४-२५ आता अंतिम टप्प्यात आहे आणि १ एप्रिलपासून नवीन वित्तीय वर्ष २०२५-२६ सुरू होणार आहे. त्यामुळे कर बचतीचे नियोजन करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. जर ३१ मार्चपूर्वी योग्य पद्धतीने योजना आखली नाही, तर तुम्हाला जादा कर भरावा लागू शकतो.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०२५ साठी काही करसवलती जाहीर झाल्या असल्या, तरी त्याचा फायदा प्रत्यक्षात १ एप्रिल २०२६ पासून मिळेल. त्यामुळे २०२४-२५ या वर्षासाठी कर नियोजन हे जुन्या नियमांनुसारच करावे लागणार आहे.
कर संरचना निवडताना घ्या योग्य निर्णय Tax
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला करदात्यांना दोन कर संरचनांमधून (रेजीम) योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळते – जुनी कर संरचना आणि नवीन कर संरचना.
जुनी कर संरचना: यात विविध गुंतवणूक पर्यायांसाठी कर बचतीच्या सवलती मिळतात, जसे की PPF, ELSS, EPF, विमा योजना आणि विविध कलमांअंतर्गत वजावटी. मात्र, या पर्यायात कराचे दर तुलनेने जास्त असतात.
नवी कर संरचना: यात करदर तुलनेने कमी ठेवण्यात आले आहेत, मात्र, कोणत्याही प्रकारच्या वजावटी किंवा कर बचतीच्या योजनांचा लाभ मिळत नाही.
करदात्यांनी आपले उत्पन्न, गुंतवणूक आणि खर्च लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडावा. योग्य कर संरचना निवडणे कठीण वाटत असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. कर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने आधीच नियोजन करणे गरजेचे आहे. TAX
जुनी कर संरचेमध्ये मिळणाऱ्या सवलती
जुनी कर संरचेनुसार गुंतवणुकीसाठी विविध सवलती मिळतात.
कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपये पर्यंत गुंतवणुकीवर कर वजावट मिळू शकते.
राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) अतिरिक्त ५०,००० रुपये पर्यंत वजावट उपलब्ध आहे.
आरोग्य विमा हप्त्यावरही कर सवलत मिळते –
२५,००० रुपये पर्यंत (वैयक्तिक विम्यासाठी)
५०,००० रुपये पर्यंत (वरिष्ठ नागरिक पालकांसाठी)
वेतनदार व्यक्तींना ७५,००० रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळते.
यामुळे एकूण कर सवलत २.२५ लाख रुपये पर्यंत जाऊ शकते, आणि NPS गुंतवणुकीसह ही सवलत २.७५ लाख रुपये पर्यंत वाढू शकते.
गृहकर्ज आणि भाडेकरूंना मिळणाऱ्या सवलती
जर तुम्ही जुनी कर संरचना निवडली, तर तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजावर करसवलत मिळू शकते.
कलम २४बी अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावर २ लाख रुपये पर्यंत वजावट मिळते.
जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर HRA (गृहनिर्माण भत्ता) अंतर्गत करसवलत मिळू शकते.
HRA अंतर्गत कर वजावटीची गणना:
समजा तुमचे मासिक वेतन ५०,००० रुपये आहे आणि तुम्हाला २०,००० रुपये HRA मिळतो, तसेच तुम्ही २५,००० रुपये भाडे भरत आहात. अशा वेळी HRA वजावट खालील तीन गणनांपैकी कमीत कमी रकमेवर लागू केली जाते:
1. पूर्ण HRA रक्कम – २०,००० रुपये
2. मूलभूत वेतनाच्या ५०% पर्यंत – २५,००० रुपये
3. भाडे – (मूलभूत वेतनाचा १०%) = २०,००० रुपये
यापैकी सर्वात कमी रक्कम HRA वजावट म्हणून ग्राह्य धरली जाते. त्यामुळे भाडेकरूंनाही योग्य नियोजन केल्यास कर बचतीचा फायदा घेता येतो. TAX
३१ मार्चपूर्वी कर नियोजन का आवश्यक?
३१ मार्च ही आर्थिक वर्षाच्या समाप्तीची तारीख आहे, त्यामुळे या तारखेपर्यंत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जर वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, तर नंतर कर बचतीचा कोणताही पर्याय उपलब्ध नसेल. कर देय रक्कम जास्त होऊ नये यासाठी वेळेत गुंतवणूक करून योग्य करसवलतींचा लाभ घ्यावा.