diwali memories prapti redkar interview : प्रत्येक सणामागे काहीतरी खास भावना, आपलेपण आणि गोड आठवणी दडलेल्या असतात. दिवाळी हा असाच एक सण आहे जो प्रकाश, आनंद, कुटुंब आणि नात्यांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. लहानपणी दिवाळीचा सण म्हणजे फटाके, फराळ, नवे कपडे आणि नातेवाईकांची गर्दी — अशी रंगतदार परंपरा अनेकांच्या मनात आजही जिवंत आहे. अशाच काही आठवणींना उजाळा दिला आहे प्रसिद्ध अभिनेत्री Prapti Redkar हिने.
‘सावळ्याची जणू सावली’ या लोकप्रिय मालिकेत ‘सावली’ची भूमिका साकारणारी Prapti Redkar दिवाळीच्या आठवणी सांगताना खूपच भावूक झाली. ती म्हणाली, “प्रत्येक वर्षी मी या सणाची आतुरतेने वाट पाहत असते. लहानपणी माझ्या नानीच्या घरी आम्ही सगळे चुलत भावंडे एकत्र जमायचो आणि पहाटे चार वाजता कोण सर्वात आधी फटाका फोडतो याची स्पर्धाच व्हायची. ती धावपळ, ती हसण्याची गंमत आजही आठवते.”
तिने पुढे सांगितलं, “दिवाळीत आईवडिलांनी आणलेले नवे कपडे घालून मरीन लाइन्सला फिरायला जाणं ही माझ्यासाठी अत्यंत खास गोष्ट आहे. ही सवय आजही मनात कोरली गेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी फटाके फोडणं बंद केलं आहे. वायूप्रदूषण वाढतं, पर्यावरणावर परिणाम होतो… माझ्या छोट्याशा कृतीने निसर्गाचं रक्षण होत असेल, तर मी ते नक्की करणार.”
दिवाळीचा सण फक्त फटाक्यांपुरता मर्यादित नसतो, हे स्पष्ट करत Prapti Redkar म्हणाली, “माझ्यासाठी खरा आनंद म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणं, फराळ बनवण्यात हातभार लावणं आणि नातेवाईकांना भेटणं. हाच दिवाळीचा आत्मा आहे.”
ती हसत म्हणाली, “माझं व्यक्तिमत्त्व फुलबाजी आणि चक्रीसारखं आहे. फुलबाजीसारखं तडतडत मी सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावपळ करत असते. दिवाळीच्या उत्साहासारखीच माझ्या आयुष्यातही ही चैतन्याची उर्जा कायम असते.”
हे पण वाचा.. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने पूर्ण केलं स्वप्न, घरात आली नवी ‘टाटा सफारी’ Prasad Khandekar Car
प्राप्ती रेडकरसारख्या अनेक कलाकारांसाठी दिवाळी ही फक्त सण नसून आयुष्यातील गोड आठवणी पुन्हा जपण्याचा एक खास क्षण आहे. व्यस्त वेळापत्रकातही सण साजरा करण्याची ही ऊर्मीच तिच्या चाहत्यांना विशेष भावते.
हे पण वाचा.. ठरलं तर मग ज्योती चांदेकरांविषयी रोहिणी हट्टंगडी भावना व्यक्त करत म्हणाल्या.. Rohini Hatangadi Tharala Tar Mag









