dishapatani चा ‘धक-धक’ अवतार! माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक लुकला दिला मॉडर्न ट्विस्ट

dishapatani

MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये dishapatani नं परिधान केलेली सुनहरी केशरी साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. माधुरी दीक्षितच्या 90 च्या दशकातील ‘धक धक’ लुकला दिलेला हा स्टायलिश टच, सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी dishapatani पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण ठरली आहे ती तिची पारंपरिक साडीतली झळाळती एंट्री, जी थेट 90 च्या दशकातील माधुरी दीक्षितच्या ‘धक धक करने लगा’ गाण्यातील लुकची आठवण करून देते. MAMI सिलेक्ट 2025 च्या दुसऱ्या पर्वात डिशानं उपस्थित राहून फॅशन वर्तुळात एक नवीनच चर्चेचा विषय निर्माण केला.

dishapatani चा ‘धक धक’ लुक – एक ग्लॅमरस ट्रिब्यूट

दिशा ने ज्यावेळी केशरी रंगाची रिच सिल्क साडी परिधान केली, तेव्हा उपस्थितांचे नजर थांबल्या त्या तिच्यावर. तिच्या या अदा आणि अंदाजाने ती खरीखुरी महाराणीच भासत होती. ही साडी म्हणजे केवळ पारंपरिक पोशाख नव्हे, तर एक प्रकारचा फॅशन स्टेटमेंट होता—माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक लुकला एक आधुनिक आणि ट्रेंडिंग ट्विस्ट देणारा.



ही डिझायनर साडी करन तोरानी यांच्या लेबलमधून साकारलेली होती. पारंपरिक सिल्क मटेरियलच्या या साडीत बारीकसारीक सोनसळी कड व भरजरी मण्यांचे काम केलेले होते. याचबरोबर, प्लीट केलेली धोती-शैलीतील स्कर्ट आणि सिधा पल्ला, ज्यावर गोल्ड थ्रेडवर्कचे बारकाईने सजवलेले डिझाइन्स होते, या सगळ्यामुळे साडीला एक शाही लूक मिळाला. दिशाने यावर मॅचिंग फुल-स्लीव्ह्ज ब्लाउज घातले होते, ज्यामध्ये प्लंजिंग नेकलाइन आणि गोल्डन जाल वर्क होते. ब्लाउजवरील फ्लोरल बीडवर्कने तिच्या लुकमध्ये नजाकत भरली होती.

दिशाच्या या लुकची स्टाईलिंग इतकी आकर्षक होती की तिने पारंपरिक पोशाखाला एक ग्लॅमरस टच दिला. तिच्या मेकअपमध्ये वॉर्म टोन्स वापरले गेले होते — कोरल ब्लश, कॉन्टूरिंगमुळे चेहऱ्याच्या कडांना उठाव आला होता आणि ब्रिक न्यूड लिपशेडने संपूर्ण लुक पूर्णत्वास नेला. तिच्या केसांना साइड पार्टिंगमध्ये सॉफ्ट वेव्ह्ज दिले गेले, जे तिच्या चेहऱ्याला अधिक फ्रेम करत होते. त्याचबरोबर, डोळ्यांवर स्मज्ड आयलाइनर, काजळ आणि भरपूर मस्काऱ्याचा वापर करून डोलणाऱ्या पापण्यांनी एक प्रकारचा ड्रामॅटिक इफेक्ट निर्माण केला होता.

ऍक्सेसरीजबाबत बोलायचं झालं, तर दिशाने ट्रॅडिशनल गोल्ड चांदबालीज परिधान केल्या होत्या. या कानातल्यांमध्ये पांढऱ्या मोत्यांची आणि रुबी स्टोन्सची सजावट होती, जी तिच्या संपूर्ण लुकला पूरक ठरत होती.

दिशाच्या या नव्या अवतारावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या लुकचं भरभरून कौतुक केलं, तर काहींनी तो माधुरीच्या ओरिजनल ‘धक धक’ लुकची ‘watered-down rerun”’ झालेली आवृत्ती असल्याची टीका केली. प्रसिद्ध फॅशन वॉचडॉग Diet Sabya ने तर थेट इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं, “slammed the ensemble as a “watered-down rerun” of the original..”

या टीकेनंतर सुद्धा अनेक युजर्सनी दिशाच्या लुकचं समर्थन केलं. “माझ्या मते तिने तिच्या स्टाइलमध्ये हे खूपच ग्रेसफुलरी कॅरी केलं आहे,” असं एकाने म्हटलं, तर दुसऱ्यानं लिहिलं, “माझ्या मते रंग, भरतकाम आणि स्टाइल अप्रतिम आहे!”

या प्रकरणावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते—फॅशन हा चक्राकार आहे. जुन्या गोष्टी नव्याने परत येतात, काही वेळा कौतुकास पात्र ठरतात, तर काही वेळा टीकेला सामोरं जावं लागतं. पण, दिशा पटानीने ज्या धाडसाने ही साडी परिधान केली आणि जुना लुक नव्या अंदाजात जगासमोर मांडला, त्याला निश्चितच फॅशन वर्ल्डमध्ये स्थान आहे.


एकंदरीत, dishapatani चा हा ‘धक धक अवतार’ फॅशनमधील जुन्या आणि नव्या युगाच्या उत्तम संगमाचं उदाहरण ठरतो.

हे पण वाचा ..Janhvi Kapoor ला ananya birla कडून खास गिफ्ट – ५ कोटींच्या  लँबोर्गिनीमुळे सोशल मीडियावर चर्चा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *