ADVERTISEMENT

डिंपलने लालीसमोर उघड केलं गोपाळचं काळं सत्य; तरीही नवऱ्यासाठी ठाम उभी राहिली!

dimple reveals gopals truth in front of lali devmanus twist : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेत आता कथेला नवं वळण मिळणार आहे. डिंपलने गोपाळचं खरं रूप लालीसमोर आणल्यानंतर ती कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. प्रोमोमधील लालीचा आक्रमक अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे.
dimple reveals gopals truth in front of lali devmanus twist

dimple reveals gopals truth in front of lali devmanus twist : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ या लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांना धक्क्यावर धक्के देणारे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र आपापल्या पद्धतीने कथा अधिक रंगतदार करत असताना आता डिंपलच्या एंट्रीनंतर कथानकाला मोठं वळण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे गोपाळचं खरं रूप लालीसमोर येणार असल्याने पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मालिकेत सुरुवातीपासूनच लालीचं पात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. गोपाळवर जीवापाड प्रेम करणारी लाली त्याच्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते, हे अनेकदा पाहायला मिळालं. गोपाळच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीला ती स्वतःचा शत्रू मानते. त्याच्या प्रेमासाठी ती कोणतीही मर्यादा ओलांडू शकते, हे मालिकेतील अनेक घटनांमधून स्पष्ट झालं आहे.

माधुरीच्या ट्रॅकपासून लालीच्या धोकादायक स्वभावाची झलक प्रेक्षकांनी पाहिली होती. गोपाळने पैशांसाठी माधुरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्याशी लग्न करण्याची स्वप्नं दाखवत तिला घरातील पैसे आणि दागिने घेऊन येण्यास भाग पाडलं. मात्र ही गोष्ट लालीपर्यंत पोहोचताच तिने संतापाच्या भरात माधुरीचा कायमचा काटा काढला. त्यानंतर आर्या गोपाळच्या आयुष्यात आली तेव्हाही लाली शांत बसली नाही. गोपाळ आणि आर्या जवळ येत असल्याचं लक्षात येताच आर्याचाही शेवट तिनेच केला.

याचदरम्यान अनेक गुन्ह्यांचं गुपित लपवण्यासाठी लालीने इतरांनाही संपवलं. शामलने गोपाळचं सत्य पाहिल्यानंतर ती जिवंत राहिली तर सगळं बाहेर येईल, या भीतीने तिचाही खून करण्यात आला. गोपाळ आणि लालीमध्ये अनेकदा वाद झाले, एकमेकांविरोधात कटकारस्थानंही रचली गेली, पण तरीही लालीचं प्रेम कमी झालेलं दिसलं नाही. गोपाळला शिक्षा होण्याची वेळ आली असताना शेवटी त्यालाच वाचवण्याचा निर्णय तिने घेतला होता.

आता मालिकेत डिंपलची एंट्री झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये डिंपल थेट लालीसमोर गोपाळचं खरं सत्य उघड करते. ती लालीला सांगते की गोपाळ हा साधा माणूस नसून बहुरूपी देवीसिंग आहे, ज्याने डॉक्टर अजितकुमार देवचं रूप घेऊन अनेक महिलांना फसवलं आहे. तिच्या हातातील फोटो पाहून लाली काही क्षण शांत राहते, मात्र पुढच्याच क्षणी ती ते फोटो मुसळात टाकून देते.

हे पण वाचा.. शिमल्याच्या थंडीत अभिज्ञा भावेचा स्टायलिश विंटर लूक; पती मेहुलसोबत रोमँटिक फोटो व्हायरल

dimple reveals gopals truth in front of lali devmanus twist

प्रोमोमध्ये लालीचा संवाद विशेष चर्चेत आला आहे. “अजितकुमार गेला मुसळात… माझ्यासाठी हा फक्त गोपाळ आहे आणि पुढेही तो गोपाळ म्हणूनच जगणार,” असं ती ठामपणे सांगताना दिसते. यानंतर ती डिंपललाही इशारा देते की आता पुढे सगळं तिच्या मनाप्रमाणे होणार आहे.

हे पण वाचा.. काटा ग्रुप’ची मैत्री अजूनही कायम! तन्वी कोलते आणि रेवा कौरासेची राकेश बापटच्या घरी खास भेट

लालीचा हा निर्णय मालिकेच्या कथेला कोणत्या दिशेने घेऊन जाणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. डिंपल आणि लाली आमनेसामने आल्यावर नेमकं काय घडणार, गोपाळचं आणखी कोणतं रहस्य समोर येणार आणि लालीचं प्रेम तिला पुन्हा कोणत्या टोकाला नेणार, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.