ADVERTISEMENT

“साधा माणूस नाहीये मी!” – धनंजय पोवारच्या बारावीच्या मार्कशीटने उडवली चाहत्यांची झोप! Dhananjay Powar 12th mark

Dhananjay Powar बिग बॉस फेम धनंजय पोवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. त्याच्या १२वीच्या मार्कशीटमधील '३५ गुणां'मुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडालाय.
Dhananjay Powar

Dhananjay Powar बिग बॉस फेम धनंजय पोवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. त्याच्या १२वीच्या मार्कशीटमधील ‘३५ गुणां’मुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडालाय.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि ‘डीपी दादा’ या नावाने लोकप्रिय झालेला धनंजय पोवार सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय. पण यावेळी कारण त्याच्या अभिनय कारकिर्दीचं किंवा एखाद्या नव्या प्रोजेक्टचं नसून त्याच्या बारावीच्या मार्कशीटचं आहे.

धनंजय सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर तो नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असतो. नुकतंच त्याने ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतलं, ज्यात अनेकांनी मजेशीर प्रश्न विचारले. त्यातलाच एक प्रश्न होता – “तुला बारावीत किती टक्के मिळाले होते?”

या प्रश्नाचं उत्तर धनंजयनं Dhananjay Powar नेहमीच्या ‘डीपी स्टाईल’मध्ये दिलं. तो म्हणाला, “३५, ३५, ३५, ३५, ३५, ३५… साधा माणूस नाहीये मी!” पुढे त्याने स्पष्ट केलं की, “हे गुण मिळवण्यासाठी मी तब्बल सात महिने मेहनत घेतली!”

Dhananjay Powar 12th mark
Dhananjay Powar 12th mark

अर्थातच, हे ऐकून चाहत्यांना विश्वास बसेना. त्यामुळे धनंजयनं थेट स्वत:ची १२वीची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केली. या मार्कशीटमध्ये त्याचे नाव आणि प्रत्येक विषयात मिळालेले ३५ गुण अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. म्हणजेच धनंजयने सर्व विषयांमध्ये केवळ पासिंग मार्क्स मिळवत एकूण ३५ टक्के मिळवलेत, आणि हे त्याचं अभिमानाने सांगणं सोशल मीडियावर ‘वायरल’ झालं आहे.

धनंजय पोवारच्या या पोस्टनं चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडवली. अनेकांनी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी मिश्किल टोलेही लगावले. “सगळ्या विषयात एकसारखे गुण मिळवणं म्हणजे टॅलेंट आहे!”, अशी कमेंट देखील एका युजरने केली.

या सेशनमध्ये अजून एक प्रश्न लक्ष वेधून गेला – एक चाहत्यानं त्याला विचारलं, “तुमचं वय खरंच २४ आहे का? मला तर २७ वाटतं.” यावर धनंजयनं “माझं वय ४० आहे” असं हसत उत्तर दिलं. Dhananjay Powar age

**‘बिग बॉस मराठी’**च्या मंचावर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवणाऱ्या धनंजयनं आपल्या प्रामाणिक आणि दिलखुलास स्वभावाने सोशल मीडियावरही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शो संपल्यानंतर तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात झळकला आणि त्याचे यूट्यूबवरील व्ह्लॉग्स व reels सुद्धा दररोज प्रचंड लोकप्रियता मिळवत आहेत.

धनंजय पोवार Dhananjay Powar हा आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणा ठरत आहे. शिक्षणात फारसे यश मिळालं नसतानाही तो स्वतःची ओळख निर्माण करू शकतो हे त्याचं उदाहरण स्पष्टपणे सांगतं.

शेवटी, “साधा माणूस नाहीये मी” हे वाक्य केवळ एक जोक नसून त्याचं यश, संघर्ष आणि आत्मविश्वास या सगळ्याचं प्रतीक आहे.