devmanus upcoming twist lali traps gopal arrest : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “देवमाणूस” सध्या अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत शांत, निरागस आणि मदतीला धावून जाणारा म्हणून ओळखला जाणारा गोपाळ प्रत्यक्षात किती भयंकर गुन्हेगार आहे, हे प्रेक्षकांनी पाहिले आहे. अनेक खून करूनही तो इतक्या हुशारीने पुरावे लपवतो की, गावकऱ्यांच्या नजरेत तो अजूनही देवमाणूसच राहतो.
गावातील लोक त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय घेणे अवघड जाते. मात्र, या सगळ्या खेळाला आता एक नवा वळण मिळाले आहे. गोपाळची पत्नी लालीला त्याच्या गुन्ह्यांची पूर्ण माहिती मिळाल्याने परिस्थिती बदलू लागली आहे.
लालीने स्वतःच्या मार्गाने गोपाळला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गोपाळच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या मृत्यूमागेही तिचा हात असल्याचे संकेत मिळतात. एवढेच नव्हे, तर तिने गोपाळचे मोठे पैसेही लपवून ठेवले आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी गोपाळने तिच्यावर अत्याचार केले, तिला त्रास दिला, पण लालीने एक शब्दही बाहेर पडू दिला नाही.
या संघर्षात गोपाळने लालीच्या आईलाही सोडले नाही. मात्र, लालीने आपली हुशारी दाखवत त्याच्या हातातून सुटका केली आणि एका सुरक्षित ठिकाणी जाऊन त्याच्याविरुद्ध योजना आखायला सुरुवात केली.
दरम्यान, समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये गोपाळच्या अडचणी वाढल्याचे स्पष्ट दिसते. एका गूढ चिठ्ठीतून त्याच्या पापांचा उल्लेख केला जातो, आणि त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर मार्तंड जामखंडे थेट त्याच्या दुकानात पोहोचतात. गोपाळला सर्वांसमोर पकडून त्याला बेड्या ठोकल्या जातात आणि गावात फिरवले जाते.
हे पण वाचा.. DP दादाचा अनुश्री मानेला ठाम पाठिंबा, “सगळे मतभेद विसरा आणि तिला जिंकवा!”
या प्रसंगी गावकऱ्यांना मोठा धक्का बसतो. लालीची आईही संतापून त्याला थप्पड मारते आणि आपल्या मुलीबद्दल विचारते. या सर्व घटना पाहताना लाली दूरून शांतपणे सगळं बघत असते आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तिच्यासाठी ही फक्त सुरुवात असल्याचे ती मनात म्हणते.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मध्ये “पूर्वा शिंदे”ची दमदार एन्ट्री; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
devmanus upcoming twist lali traps gopal arrest
शेवटी, गोपाळवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू होते आणि त्याला तुरुंगात नेले जाते. आता पुढे नेमकं काय होणार, गोपाळ स्वतःला वाचवू शकेल का, की लालीचा प्लॅन पूर्ण यशस्वी होणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.









