इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स ( DC vs LSG ) यांच्यातील सामना एका रोमांचक क्षणी संपला. दिल्लीने अवघ्या एका विकेटने विजय मिळवत चाहत्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत तणावात ठेवले. दिल्लीच्या या विजयाचे नायक ठरले युवा फलंदाज आशुतोष शर्मा, ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सामना फिरवला. 31 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 5 भव्य षटकारांसह नाबाद 66 धावा करत त्याने संघाला विजय मिळवून दिला.
Table of Contents
दिल्लीची खराब सुरुवात, मग आशुतोषचा जादूई खेळ ( DC vs LSG )
210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था बिकट झाली होती. अवघ्या 65 धावांवर संघाने 5 महत्त्वाचे गडी गमावले. पण त्यानंतर मैदानावर उतरलेल्या आशुतोषने आपल्या आक्रमक खेळीने संपूर्ण सामन्याचा रंग बदलला. त्याने प्रथम ट्रिस्टन स्टब्स (34) आणि नंतर विपराज निगम (39) सोबत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. शेवटच्या काही षटकांत त्याने जबरदस्त फटकेबाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 209 धावांचा भक्कम स्कोअर उभारला. मिचेल मार्श (72) आणि निकोलस पूरन (75) यांनी तुफानी फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांना झुंजार प्रत्युत्तर दिले. लखनौच्या या मोठ्या धावसंख्येत त्यांच्या जोडीने मोठा वाटा उचलला. दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 फलंदाजांना माघारी धाडले. ( DC vs LSG )
दिल्लीला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात केवळ 6 धावांची गरज होती, पण संघाकडे फक्त 1 विकेट बाकी होती. अशा निर्णायक क्षणी मोहित शर्माला बाद करण्याची संधी लखनौच्या कर्णधाराने गमावली. यानंतर मोहितने एका चेंडूवर एक धाव घेतली, आणि त्यानंतर आशुतोषने शाहबाज अहमदच्या तिसऱ्या चेंडूवर सडेतोड षटकार मारत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
ही दिल्ली कॅपिटल्ससाठी IPL इतिहासातील सर्वात मोठी रन चेस ठरली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीला अनेक अडचणी आल्या, पण आशुतोषने संयम आणि आक्रमकता यांचा उत्तम समतोल राखत सामना जिंकला. गेल्या हंगामात पंजाबसाठीही त्याने अशीच खेळी केली होती, पण या सामन्यातील त्याचे प्रदर्शन अधिक जबरदस्त ठरले. DC Wins DC vs LSG ).
IPL 2025: dc vs lsg थरारक सामना; पंत आणि राहुल आमनेसामने!
दोन्ही संघांची अंतिम इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), फाफ डु प्लेसिस, जैक फ्रेजर-मैगर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार. इम्पॅक्ट प्लेयर: करुण नायर, आशुतोष शर्मा, डोनोवॉन फरेरा, त्रिपुराना विजय, दर्शन नलकंडे.
लखनौ सुपर जायंट्स: ऋषभ पंत (कर्णधार), ऐडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेविड मिलर, प्रिन्स यादव, दिग्विजय राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर, रवि बिश्नोई.
आशुतोष शर्माचा पराक्रम – भविष्यातील स्टार?
या विजयासह दिल्लीने IPL 2025 मध्ये जोरदार सुरुवात केली आहे. विशेषतः आशुतोष शर्माच्या या खेळीने त्याला क्रिकेटप्रेमींच्या हृदयात स्थान मिळवून दिले आहे. त्याची सहज आणि आक्रमक शैली पाहता, तो आगामी सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावणार, हे नक्की! ( DC vs LSG )