IPL 2025 मध्ये csk vs rcb tickets यांच्यातील सामना पाहण्यासाठी तिकिटे कुठे आणि कशी खरेदी करायची याबाबत संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या! ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट बुकिंग पर्याय, दर आणि बुकिंग प्रक्रिया समजून घ्या.
Table of Contents
IPL 2025 चा थरार दिवसेंदिवस वाढत आहे आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या संघांचे सामने पाहण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील लढत प्रचंड रंगतदार ठरणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या CSK विरुद्ध विराट कोहलीचा RCB यांच्यातील हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
हा सामना चेन्नईतील प्रसिद्ध एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये या सामन्याची प्रचंड चर्चा असून, स्टेडियममध्ये सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, csk vs rcb tickets या हाय-वोल्टेज सामन्यासाठी तिकिटे कशी मिळवायची, तिकिटांचे दर किती आहेत, आणि कोणत्या माध्यमातून ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट बुकिंग करता येईल, याबाबत सर्व महत्त्वाची माहिती येथे दिली आहे.
IPL 2025 तिकिट बुकिंगसाठी पर्याय
IPL 2025 साठी तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध आहेत. ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी अधिकृत वेबसाइट आणि अॅप्स उपलब्ध असून, ऑफलाइन खरेदीसाठी स्टेडियमवर थेट तिकिटे मिळू शकतात.
ऑनलाइन तिकीट बुकिंग
IPL 2025 साठी अधिकृत तिकीट बुकिंग भागीदार BookMyShow आणि PayTM Insider हे आहेत. क्रिकेटप्रेमी हे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म्स वापरून घरबसल्या काही क्लिकमध्ये तिकीट खरेदी करू शकतात.
BookMyShow: CSK आणि इतर संघांच्या काही सामन्यांसाठी BookMyShow अधिकृत तिकीट विक्री प्लॅटफॉर्म आहे.
PayTM Insider: IPL 2025 च्या अनेक सामन्यांसाठी PayTM Insider वर तिकीट बुक करता येईल.
RCB अधिकृत वेबसाइट: RCB च्या घरी होणाऱ्या सामन्यांची तिकीट विक्री त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून करण्यात येते.
हे पण वाचा..IPL 2025: pbks vs gt नव्या नेतृत्वाखाली नव्या आशेची सुरूवात..
ऑफलाइन तिकीट खरेदीसाठी पर्याय
ज्यांना स्टेडियमवर जाऊन तिकिटे खरेदी करायची असतील, त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत.
स्टेडियम बॉक्स ऑफिस: सामन्याच्या काही दिवस आधी स्टेडियमवरील अधिकृत बॉक्स ऑफिसमध्ये तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होतात.
अधिकृत रिटेल आउटलेट्स: काही अधिकृत विक्री केंद्रांवरही तिकिटे खरेदी करता येतात.
csk vs rcb tickets तिकिटांचे दर आणि उपलब्धता
IPL सामन्यांसाठी तिकिटांचे दर स्टेडियमनुसार वेगळे असतात. CSK विरुद्ध RCB सामन्यासाठी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये तिकीट किमती ₹1700 पासून सुरू होतात आणि प्रीमियम सीट्ससाठी ₹30,000 ते ₹50,000 पर्यंत जाऊ शकतात.
IPL 2025 तिकिट दर आणि स्टेडियमनुसार अधिकृत प्लॅटफॉर्म
IPL 2025 साठी तिकीट कसे बुक करावे?
IPL तिकिटे मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे आहेत:
1. अधिकृत प्लॅटफॉर्मला भेट द्या – BookMyShow, PayTM Insider किंवा संघाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
2. सामना निवडा – तुमच्या आवडीनुसार सामना निवडा.
3. आसन निवडा – उपलब्ध सीट्सपैकी तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडा.
4. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा – तुमच्या सुविधेनुसार ऑनलाइन पेमेंट पर्याय निवडा आणि बुकिंग पूर्ण करा.
5. ई-तिकीट डाउनलोड करा – तुमच्या ई-मेल किंवा अॅपवर तिकीट डाउनलोड करून ठेवा.
हे पण वाचा..DC Wins DC vs LSG : आशुतोष शर्माने लखनौच्या हातून खेचून घेतली मॅच, दिल्लीचा विजय
RCB च्या होम मॅचसाठी विशेष ऑफर
यावर्षी RCB च्या होम मॅचसाठी Navi UPI वापरकर्त्यांना विशेष सुविधा देण्यात आली आहे. RCB च्या बेंगळुरूतील होम मॅचसाठी तिकिटांची विक्री 18 मार्च 2025 पासून 24 तास लवकर सुरू होईल. अन्य क्रिकेटप्रेमींसाठी सामान्य विक्री 19 मार्च 2025 पासून सुरू होईल.
IPL 2025 मध्ये RCB च्या चाहत्यांसाठी अनेक रोमांचक सामने असणार आहेत. त्यामुळे, स्टेडियममध्ये थेट सामना पाहण्यासाठी तिकिटे csk vs rcb tickets लवकरात लवकर बुक करा आणि IPL च्या थराराचा आनंद घ्या!