मराठी दूरदर्शनवरील लोकप्रिय चेहरा Chetan Vadnere सध्या ‘लपंडाव’ या मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठिपक्यांची रांगोळी, लेक माझी लाडकी आणि फुलपाखरु यांसारख्या मालिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे. पण ‘फुलपाखरु’ ही लोकप्रिय मालिका त्याने अर्ध्यातच का सोडली, हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. अखेर चेतनने याचं खरं कारण उघड केलं आहे.
चेतन वडनेरेने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अगदी छोट्या भूमिकांपासून केली होती. त्याने 2013 साली ‘आराधना’ या मालिकेत एका दिवसासाठी छोटा रोल साकारला होता. त्याच मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर होती. “त्या काळात मी वन डे आर्टिस्ट म्हणून काम करत होतो, आणि आज लीड भूमिका करतोय – ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे,” असं चेतनने सांगितलं.
लग्नाआधीचा मजेशीर किस्सा: मृणाल दुसानिसची नीरजसाठीची चिठ्ठी!
‘लेक माझी लाडकी’ या मालिकेच्या आधी तो छोट्या-छोट्या भूमिका करत होता. पण एका क्षणी त्याने स्वतःला सांगितलं की, आता फक्त लहान भूमिका नकोत, तर लीडपर्यंत पोहोचायचं आहे. या निर्णयानंतर त्याने पूर्ण लक्ष स्वतःला तयार करण्यात घातलं.
‘फुलपाखरु’ मालिकेबद्दल बोलताना चेतन म्हणाला, “एका टप्प्यानंतर त्या कॅरेक्टरमध्ये काहीच उरलं नव्हतं. मग मी ती मालिका सोडली आणि स्वतःला पुन्हा तयार करण्यासाठी नाशिकला गेलो. जिम, थिएटर, ऑडिशन्स — सगळं पुन्हा सुरू केलं.” काही काळानंतर त्याने ‘अल्टी पलटी सुमडीत कल्टी’ या मालिकेसाठी ऑडिशन दिलं आणि ती त्याची पहिली लीड भूमिका ठरली. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी बावकर होती.
या मालिकेनंतर ‘ठिपक्यांची रांगोळी’ मध्ये त्याला पुन्हा मोठी संधी मिळाली. “या मालिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. नंतर प्रोड्युसर म्हणाले की माझ्यासोबत दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. फक्त औपचारिकता म्हणून ऑडिशन घेतलं,” असं चेतन हसत सांगतो.
चेतनच्या मते, उत्तम काम करण्यासाठी मेहनत महत्त्वाची असते, पण ते दाखवण्यासाठी संधी मिळणं हे नशिबावर अवलंबून असतं. “खूप प्रतिभावान अभिनेते आहेत जे आज घरी बसले आहेत. दिसायला हँडसम, टॅलेंटेड असूनही त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही,” असं तो म्हणतो.
मुलाखतीच्या शेवटी चेतन वडनेरेने Chetan Vadnere सांगितलं की, “दहा वर्षांपूर्वी जे स्वप्न घेऊन मी मुंबईत आलो, ते अजून पूर्ण झालं नाही. मला दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंसोबत काम करायचं आहे.”
आज तो ‘लपंडाव’ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. पण त्यामागे आहे अनेक वर्षांची मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य — ज्यामुळे Chetan Vadnere आज मराठी मालिकांतील एक ओळख बनला आहे.









