प्रथमेश-प्रियदर्शिनीची केमिस्ट्री जिंकते मनं; ‘gadi number 1760’ मधील ‘झननन झाला’ गाण्याची धूम
gadi number 1760 या आगामी मराठी चित्रपटातील ‘झननन झाला’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं असून, प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. आशिष कुलकर्णी यांच्या आवाजात आणि समीर सप्तीसकर यांच्या संगीतात सजलेलं हे गाणं, प्रेमाच्या नाजूक भावनांना स्पर्श करतंय. ४ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.