BSNL चा एक भन्नाट प्लान! फक्त ₹4 प्रति दिवस खर्च करून 365 दिवस वैधता असलेला रिचार्ज. जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत हा किती फायदेशीर आहे.
Table of Contents
आजच्या काळात Mobile Phone हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग झाला आहे. फोनशिवाय एक दिवसही घालवणे कठीण झाले आहे. पण सतत फोन चालू ठेवण्यासाठी योग्य आणि परवडणारा Recharge Plan निवडणे महत्त्वाचे आहे.
याचाच विचार करून BSNL ने ग्राहकांसाठी एक खास वार्षिक रिचार्ज प्लान लाँच केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ₹4 प्रतिदिन खर्चात तुम्हाला संपूर्ण 365 दिवस सेवा मिळणार आहे. हा प्लान Jio आणि Airtel च्या तुलनेत चांगला पर्याय ठरतो. चला तर मग, जाणून घेऊया या दमदार प्लानची संपूर्ण माहिती आणि त्याची इतर कंपन्यांच्या प्लान्सशी तुलना.
BSNL चा ₹1515 रिचार्ज प्लान: फुल बॅनिफिट्स
BSNL च्या ₹1515 रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. या प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते, ज्यामुळे ग्राहक संपूर्ण वर्षभर सेवा वापरू शकतात. दररोज 2GB डेटा मिळत असल्याने, एकूण 730GB डेटा उपलब्ध होतो. यासोबतच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रति दिवस 100 SMS मोफत मिळतात. तसेच, ग्राहकांना OTT कंटेंटचा अतिरिक्त लाभ मिळतो. विशेष म्हणजे, दररोजचा डेटा मर्यादा संपल्यानंतरही 40Kbps स्पीडने इंटरनेट सुरू राहते, त्यामुळे कनेक्टिव्हिटी कायम राहते.
फक्त ₹4 प्रति दिवस खर्च
हा प्लान घेतल्यानंतर तुम्ही 4 प्रति दिवस खर्च करून तुम्ही संपूर्ण वर्षभर तुमचा फोन सक्रिय ठेवू शकता, त्यासोबतच भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि कमी बजेटमध्ये जास्त फायदा देणारा हा एक रिचार्ज प्लॅन आहे.
Jio चा 336 दिवसांचा रिचार्ज प्लान
Jio चा 336 दिवसांची वैधता असलेला वॉयस ओन्ली प्लान ₹3000+ किमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये Unlimited Calling आणि 3600 SMS समाविष्ट आहेत. तथापि, या प्लानमध्ये डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे BSNL च्या प्लानच्या तुलनेत हा प्लान कमी फायदेशीर ठरतो.
Airtel चा 365 दिवस चालणारा प्लान
Airtel कडेही एक वर्षासाठी काही प्लान्स आहेत, परंतु त्यांची किंमत Jio प्रमाणेच जास्त आहे. Airtel चा प्लान ₹1849 मध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता, Unlimited Calling, आणि 3600 SMS समाविष्ट आहेत. तथापि, यामध्ये डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे BSNL चा ₹1515 प्लान अधिक किफायतशीर आणि फायदेशीर पर्याय ठरतो.
BSNL vs Jio vs Airtel: कोणता प्लान जास्त फायदेशीर?
निकषानुसार, BSNL चा ₹1515 प्लान हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. कारण तो सर्वात स्वस्त आहे.यामध्ये 2GB/दिवस डेटा मिळतो. आणि तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT फायदे ही मिळतात. आणि जर तुम्हाला डेटा आणि OTT फायदे आवडत असतील, तर BSNL चा प्लान सर्वोत्तम आहे, तर Jio आणि Airtel चे प्लान फक्त कॉलिंग आणि SMS साठी महाग आहेत.
हे पण वाचा..Vivo V50 च्या किमतीत कपात! ग्राहकांसाठी मोठी सूट आणि आकर्षक ऑफर्स
BSNL चा ₹1515 प्लान का घ्यावा?
✅ फक्त ₹4 प्रति दिवस खर्च
✅ 1 वर्ष वैधता (365 दिवस)
✅ दररोज 2GB डेटा (730GB एकूण)
✅ अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS/दिवस
✅ OTT कंटेंटचा मोफत लाभ
✅ Jio आणि Airtel पेक्षा स्वस्त आणि फायदेशीर
BSNL ₹1515 प्लान कसा रिचार्ज करायचा?
1. BSNL ची अधिकृत वेबसाइट (bsnl.co.in) वर जाऊन Prepaid Recharge सेक्शनमध्ये ₹1515 प्लान निवडा आणि पेमेंट करा त्यानंतर तुमचा प्लान अॅक्टिव्हेट होईल. तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा बँकिंग अॅप्सद्वारे रिचार्ज करू शकता.तुम्ही या सर्व पद्धतींनी सहज रिचार्ज करू शकता आणि तुमच्या प्लानचा लाभ घेऊ शकता.
हे पण वाचा ..vivo t4x भारतात लाँच: किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या
जर तुम्हाला कमी खर्चात जास्त फायदे मिळवायचे असतील, तर BSNL चा ₹1515 रिचार्ज प्लान तुमच्या साठी चांगला पर्याय आहे. हा प्लान Jio आणि Airtel च्या तुलनेत अधिक स्वस्त आणि फायदेशीर आहे.
तर मग वाट कसली पाहताय? आजच BSNL चा ₹1515 प्लान रिचार्ज करा आणि 1 वर्ष टेन्शन फ्री व्हा!