Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar Emotional Love Story : बिग बॉस मराठी ६ सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले असले तरी घरातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमधील मतभेद, वाद आणि भांडणं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कधी तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्यातील वाद, तर कधी तन्वी आणि सागर कारंडे यांच्यातील खटकेबाजी, यासोबतच विशाल कोटीयन आणि राकेश बापट यांच्यातील मतभेद यामुळे घरातील समीकरणं सतत बदलताना दिसत आहेत.
या सगळ्या गदारोळात Bigg Boss Marathi 6 च्या घरात काही भावूक आणि प्रेरणादायी क्षणही समोर येत आहेत. अशाच एका क्षणामुळे सध्या Roshan Bhajankar पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला रोशन या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून, त्याचा आतापर्यंतचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये Roshan Bhajankar त्याच्या प्रेमकहाणीचा उलगडा करताना दिसतो. किचनमध्ये काम करत असताना तो तन्वी कोलतेशी संवाद साधतो आणि आपलं लग्न प्रेमातून झालं असल्याचं सांगतो. तो सांगतो की लग्नाच्या आधी अनेक अडचणी आल्या, समाजाकडून टोमणे मारले गेले, घरच्यांनी नकार दिला. “तू हमाली करतोस,” अशा शब्दांत अपमानही सहन करावा लागला, मात्र तरीही तो ठाम राहिला. पत्नीला धीर देत, आपण या सगळ्यांना आपल्या मेहनतीने उत्तर देऊ, असं त्यानं सांगितल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.
Roshan Bhajankar चं आयुष्य संघर्षांनी भरलेलं आहे. विदर्भाचा बॉडीबिल्डर अशी ओळख असलेल्या रोशनने अनेक वर्षे सिमेंटची पोती उचलण्याचं काम केलं आहे. आज त्याला दोन मुली आहेत आणि बिग बॉसच्या घरात त्याने एन्ट्री केली तेव्हा टीव्हीवर त्याला पाहून पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. हीच बाब प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे.
हे पण वाचा.. चार नायिकांची एन्ट्री, सुमनच्या अपहरणाचा क्लू सापडला! ठरलं तर मग मध्ये मोठा खुलासा
Bigg Boss Marathi 6 मध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले असून, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खेळताना दिसत आहे. मात्र Roshan Bhajankar ची साधी, प्रामाणिक आणि संघर्षातून उभी राहिलेली कथा त्याला इतरांपेक्षा वेगळं स्थान देताना दिसते. आता पहिल्या आठवड्यानंतर खेळात काय नवे वळण येणार, रोशनचा हा भावनिक प्रवास त्याला किती पुढे घेऊन जाणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. अंकिता वालावलकरची पहिली मकर संक्रांत ठरली अविस्मरणीय; गावात ३५० महिलांसाठी हळदीकुंकू, खास व्हिडीओ व्हायरल









