bigg boss marathi 6 rakesh bapat vad vishal Kotian : मराठी टेलिव्हिजनवर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मालिकेने जवळपास वर्षभर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि एजे-लीलाची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. अभिराम जहागीरदार अर्थात एजे ही भूमिका साकारत राकेश बापटने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं. ही मालिका मे २०२५ मध्ये निरोप घेऊन गेल्यानंतर राकेश पुढे काय करणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
आता ही उत्सुकता Bigg Boss Marathi 6 मुळे पूर्ण झाली आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची नुकतीच सुरुवात झाली असून यंदा घरात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये राकेश बापटचाही समावेश आहे. पहिल्या दिवशी राकेश काहीसा शांत आणि निरीक्षकाच्या भूमिकेत दिसला. घरात सुरू असलेल्या छोट्या वादांवर त्याने फारसं लक्ष न देता फक्त तन्वी आणि रुचिताच्या भांडणावर हलक्याफुलक्या शब्दांत टिप्पणी केली होती.
मात्र दुसऱ्याच दिवशी Bigg Boss Marathi 6 च्या घरात राकेशचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. घरातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून त्याने विशाल कोटियनला थेट प्रश्न विचारले. टॉवेल्स, स्वयंपाकघरातील व्यवस्था आणि फ्रिजमधील भाज्यांबाबत त्याने स्पष्ट भूमिका घेतली. “जर टॉवेल्स धुवायचे असतील तर ठराविक जागी ठेवा,” असं तो सांगत असतानाच विशालने त्याला प्रत्युत्तर दिलं. “तू अजून कॅप्टन नाहीस, आम्हाला काय करायचं ते सांगू नकोस,” या वाक्यानंतर दोघांमधील तणाव अधिकच वाढला.
या घटनेनंतर राकेश आणि विशाल यांच्यातील वादाची ठिणगी स्पष्टपणे दिसू लागली आहे. या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राकेशच्या चाहत्यांनी त्याच्या समर्थनार्थ अनेक कमेंट्स केल्या असून त्याला ‘विनर व्हाइब’, ‘कॅप्टन मटेरियल’ अशी विशेषणं दिली जात आहेत. Bigg Boss Marathi 6 मध्ये राकेशची ही ठाम आणि स्पष्ट भूमिका प्रेक्षकांना भावताना दिसत आहे.
हे पण वाचा.. महानगरपालिका निवडणूक 2026: सुज्ञ मतदानाचं अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचं आवाहन
वर्कफ्रंटचा विचार केला तर राकेश बापटने आपल्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटांपासून केली होती. त्यानंतर मराठी मालिकांमधून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘नवरी मिळे हिटलरला’ या सुपरहिट मालिकेनंतर आता Bigg Boss Marathi 6 च्या घरात राकेश काय खेळी करतो, कोणाशी मैत्री करतो आणि कोणाशी संघर्ष करतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.
हे पण वाचा.. फक्त प्रेमावर लग्न टिकत नाही… अमृता खानविलकरचा तरुण पिढीसाठी सल्ला









