ADVERTISEMENT

उद्धट वागणूक, नियमभंग आणि भाऊंचा संताप! Bigg Boss Marathi 6 मध्ये प्रभू शेळकेवर रितेश देशमुख भडकला!

Bigg Boss Marathi 6 च्या घरात ब्राँझ रेशन कार्डमुळे वाढलेला तणाव, प्रभू शेळकेकडून नियमांचे उल्लंघन आणि अखेर रितेश देशमुखांनी घेतलेली खरडपट्टी – या सगळ्यामुळे शोमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. घरात सुरू असलेले टास्क, सदस्यांमधील मतभेद आणि त्यातून निर्माण होणारा तणाव यामुळे हा सीझन दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालला आहे. या आठवड्यात मात्र रेशन कार्डच्या मुद्द्यावरून संपूर्ण घरात अस्वस्थ वातावरण पाहायला मिळालं.

या सीझनमध्ये प्रत्येक टास्कमधून सदस्यांना गोल्डन, सिल्व्हर किंवा ब्राँझ रेशन कार्ड मिळत आहे. गोल्डन कार्डधारकांना घरातील सर्व सुखसोयी उपलब्ध असतात, तर सिल्व्हर कार्डधारकांना मर्यादित सुविधा दिल्या जातात. ब्राँझ रेशन कार्ड मिळालेल्या सदस्यांसाठी मात्र नियम अत्यंत कडक आहेत. बेडचा वापर न करता जमिनीवर झोपणं, सर्व सदस्यांसाठी एकच वॉशरूम आणि अनेक गोष्टींपासून वंचित राहणं, अशी परिस्थिती त्यांना सहन करावी लागते.

या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने बिग बॉसने कठोर निर्णय घेत संपूर्ण घराला ब्राँझ रेशन कार्ड लागू केलं. कॅप्टन आयुष वगळता सगळ्यांनाच जमिनीवर झोपावं लागलं. सोळा सदस्यांसाठी एकच वॉशरूम असल्यामुळे अनेकांच्या संयमाची परीक्षा झाली.

याच दरम्यान ‘छोटा डॉन’ म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके वारंवार नियम मोडताना दिसला. ब्राँझ रेशन कार्ड असतानाही त्याचं वर्तन नियमांच्या चौकटीत बसत नव्हतं, अशी तक्रार बिग बॉसकडे पोहोचली. याचा थेट परिणाम भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळाला.

Bigg Boss Marathi 6 च्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखांनी प्रभूला स्पष्ट शब्दांत सुनावलं. प्रभू स्वतः २० वर्षांचा असल्याचं सांगत असल्याचा उल्लेख करत रितेश म्हणाले की, दोन आठवडे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, त्याचे लाड झाले, पण आता त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. उद्धटपणे वागणं आणि नियम मोडणं खपवून घेतलं जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

हा प्रोमो समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक प्रेक्षकांनी रितेश देशमुखांच्या भूमिकेचं कौतुक केलं असून, प्रभूला वेळेवर समज दिल्याचं मत व्यक्त केलं आहे. काहींनी तर “असं वागणं आवश्यकच होतं” असं म्हणत भाऊंच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhaka

लाडका भाऊ योजना सुरू? रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर दिव्या शिंदेला दाखवला आरसा