मराठी मनोरंजन विश्वात विनोदाची जादू निर्माण करणारे Bhau Kadam प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवून आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. निरागस हास्य, साधेपणा आणि विविध व्यक्तिरेखांमधील त्यांचा अचूक अभिनय यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके कलाकार ठरले. सिनेमे असोत वा रंगमंच, Bhau Kadam यांनी प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अलीकडेच ‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’ या पॉडकास्टमध्ये सहभागी होताना त्यांनी त्यांच्या एका चाहतीचा अनुभव शेअर केला. हा किस्सा ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. कदम सांगतात, “एक साधी-सरळ मोलमजुरी करणारी स्त्री होती. तिला ‘चला हवा येऊ द्या’ फार आवडायचं. पण तिच्याकडे टीव्ही नव्हता. शो पाहण्यासाठी ती शेजाऱ्यांकडे जायची. मात्र, काही वेळा दरवाजा बंद करून तिला नकार दिला जायचा. त्यानंतर तिने स्वतः कष्ट करून पैसे साठवले आणि टीव्ही विकत घेतला.”
इतकंच नव्हे तर त्या बाईनं घरातील देवघराच्या बाजूला Bhau Kadam यांचा फोटो ठेवला होता. रोज कामाला जाण्यापूर्वी ती त्या फोटोपाशी नमस्कार करायची. हा किस्सा ऐकून खुद्द कदमही भारावून गेले. पुढे हजाराव्या एपिसोडच्या निमित्ताने त्यांनी त्या चाहतीला स्टुडिओत बोलावलं. तेव्हा चॅनेलकडून तिला साडीचोळी भेट देण्यात आली. आज तिची मुलगी अभिनयाच्या शिक्षणासाठी प्रशिक्षण घेत आहे, कारण आईला वाटत होतं की एक दिवस तिला भाऊ कदम भेटले पाहिजेत.
या आठवणी सांगताना Bhau Kadam भावुक होत म्हणाले, “लोक इतकं प्रेम करतात, हे ‘चला हवा येऊ द्या’ मुळे शक्य झालं. आयुष्यात कुणाला एवढं मिळत नाही, पण आम्हाला दहा-अकरा वर्षांत मिळालं.”
शिवानी मुंढेकरचा ‘नमक’ गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, “नादखुळा परफॉर्मन्स!”
दरम्यान, Bhau Kadam यांचा नवा चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यात मनोज बाजपेयी, सचिन खेडेकर, गिरिजा ओक, वैभव मांगले अशा दिग्गज कलाकारांसह कदमांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.









