ADVERTISEMENT

“Baaghi 4”: टायगर श्रॉफच्या दमदार अ‍ॅक्शनला प्रेक्षकांची दाद, पण कथानकावर मिश्र प्रतिक्रिया

"Baaghi 4 advance booking" रिलीज झाल्यानंतर टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सचं कौतुक होत असलं तरी कथानकावर प्रेक्षक विभागले गेले आहेत. तर सेन्सॉर बोर्डाने तब्बल 23 सीन कापले असून, चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही प्रचंड प्रतिसाद मिळालाय.
Baaghi 4 advance booking

Baaghi 4 advance booking :बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आपल्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा ‘”Baaghi 4″’ घेऊन मोठ्या पडद्यावर परतला आहे. 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. काहींनी टायगरच्या अभिनयाची आणि अ‍ॅक्शनची जोरदार स्तुती केली, तर काहींनी कथानकावर  टीका केली आहे.

चित्रपटात टायगर श्रॉफसोबत अनुभवी अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. दोघांमधील रक्तरंजित भिडतींनी चाहत्यांना वेड लावले आहे. हरनाज संधू आणि सोनम बाजवा यांनी कथानकात भावना आणि ग्लॅमरची जोड दिली आहे. सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी #Baaghi4 आणि #TigerShroff ट्रेंड करत प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिलं – “#TigerShroff the Actor is Born. त्याच्या चेहऱ्यावरची ती तीव्रता मनाला भिडते.” दुसऱ्याने म्हटलं – “#Baaghi4 फक्त अ‍ॅक्शन नाही, तर भावना आणि प्रेमकथेने सजलेला चित्रपट आहे. #Marjaana हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे.”

तथापि, प्रत्येकजण समाधानी नव्हता. काहींनी कथा आणि पटकथेवर टीका केली. एका वापरकर्त्याने लिहिलं – “स्टोरी कमजोर, फक्त अ‍ॅक्शनचा पाऊस. 2/5 रेटिंग.” तर दुसऱ्याने याला “सिंगल स्क्रीनसाठी बनवलेला हिंसक मसाला चित्रपट” असं संबोधलं.

दरम्यान, “Baaghi 4” ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) ‘A’ सर्टिफिकेट देताना तब्बल २३ दृश्यं कापण्याचे आदेश दिले. यात येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याशी संबंधित हिंसक दृश्यं, धुम्रपानाशी निगडित काही प्रसंग, अत्यंत रक्तरंजित मारामाऱ्या तसेच नग्नतेशी संबंधित शॉट्स कापले गेले. काही संवादांतील शब्दसुद्धा बदलले किंवा म्युट करण्यात आले. सुरुवातीला चित्रपटाची लांबी २ तास ४३ मिनिटे होती, मात्र कट्सनंतर ती २ तास ३७ मिनिटे एवढी कमी झाली.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर “Baaghi 4” ने रिलीजपूर्वीच जोरदार अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून ट्रेड सर्कलमध्ये चर्चा रंगवली आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, ब्लॉक सीट्ससह सुमारे 5.85 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरांत तिकीट दर ₹400 ते ₹1200 पर्यंत पोहोचले असूनही प्रेक्षकांचा उत्साह कायम आहे.

हे पण वाचा.. नारायणी शास्त्रीचा भीक मागतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का काय आहे व्हिडीओ मागील सत्य?

ट्रेड तज्ज्ञांच्या मते, “Baaghi 4” कडून पहिल्या दिवशी किमान 8-9 कोटींची कमाई अपेक्षित आहे. ईद-ए-मिलादच्या सुट्टीमुळे ओपनिंगला आणखी चालना मिळेल अशी शक्यता आहे. मागील काही फ्लॉप चित्रपटांनंतर टायगर श्रॉफसाठी हा चित्रपट मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

एकंदरीत, ‘”Baaghi 4″’ ही मालिकेतील अपेक्षितप्रमाणे अ‍ॅक्शनने भरलेली फिल्म ठरली आहे. चाहत्यांना टायगर श्रॉफचा नवा दमदार अवतार भावला असला तरी कथा आणि पटकथेच्या बाबतीत मतभेद कायम राहिले आहेत.

हे पण वाचा.. ग्लॅमरपासून दूर पण.. तिच्या साधेपणामुळे चर्चेत ‘साधी माणसं’ फेम आकाश नलावडेच्या अर्धांगिनी रुचिका धुरीला तुम्ही पाहिलंय का?