देवमाणूस फेम किरण गायकवाड आणि अंकिता राऊतच्या जोडीचं ‘Daryacha Pani’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला!
देवमाणूस फेम किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत यांची जोडी ‘Daryacha Pani’ या नव्या कोकणी कोळी गाण्यात झळकली आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत हे गाणं अलिबागच्या नयनरम्य किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांच्या आवाजात सादर झालेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे.