DC Wins DC vs LSG : आशुतोष शर्माने लखनौच्या हातून खेचून घेतली मॅच, दिल्लीचा विजय
दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर अविस्मरणीय विजय मिळवत अवघ्या एका विकेटने सामना जिंकला. 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली होती, मात्र आशुतोष शर्माने अतिशय उत्तम खेळी करत सामना पूर्णपणे फिरवला. त्याने 31 चेंडूंमध्ये नाबाद 66 धावा करत दिल्लीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.