RR vs KKR Win : केकेआरचा पहिला विजय, क्विंटन डी कॉकचा चमकदार खेळ; राजस्थानची सलग दुसरी हार
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात केकेआरने दमदार विजय मिळवला. गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 151 धावा केल्या, मात्र क्विंटन डी कॉकच्या अप्रतिम खेळीमुळे केकेआरने हे लक्ष्य फक्त दोन विकेट्स गमावून सहज पार केले.