Asrani Passed Away हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी विनोदी कलाकार असरानी यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन असरानी असं त्यांचं पूर्ण नाव होतं, पण प्रेक्षकांसाठी ते फक्त “असरानी” म्हणूनच ओळखले जात. Asrani Death या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
१९४१ साली जयपूरमध्ये जन्मलेल्या असरानी यांनी सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थानमधून पदवी प्राप्त केली. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून रंगभूमी आणि रेडिओशी नातं जोडलं. सुरुवातीच्या काळात अभिनय क्षेत्रात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार यांनी त्यांना “तू व्यावसायिक अभिनेता नाहीस” असं म्हटलं होतं, मात्र त्यांच्या उत्तम अभिनयाने त्याच गुलजार यांनी नंतर कौतुकही केलं होतं. Asrani Death
असरानी यांनी ‘हरे कांच की चूडिया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘गुड्डी’, ‘अभिमान’, ‘छोटीसी बात’, ‘चितचोर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. मात्र, १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटातील “अंग्रेजो के जमाने का जेलर” ही त्यांची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. या पात्रात त्यांनी विनोदाचा असा अंदाज दाखवला की, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या खास बोलण्याच्या पद्धतीने, स्टाईलने आणि चेहऱ्यावरील भावनांनी ही भूमिका अजरामर ठरली.
असरानी यांनी केवळ विनोदी नव्हे, तर गंभीर आणि भावनिक भूमिकाही प्रभावीपणे साकारल्या. शेकडो चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. २००४ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकारणातही पाऊल टाकलं. त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून त्यांनी सांगितले की असरानी हे गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
लाडक्या पुतणीने केलं काकीचं औक्षण! Genelia Deshmukh भावुक; म्हणाली, “डोळे पाणावले…”
Asrani Death या बातमीनं हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शोलेतील त्यांचा “जेलर” असो वा ‘छोटीसी बात’मधील साधा पण गोंडस पात्र – असरानी यांनी प्रत्येक भूमिकेला जीव दिला. त्यांचं हसवणारं आणि भावनांना स्पर्श करणारं अभिनय कौशल्य नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील.









