Rupali Bhosle Accident : स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेत सरकारची दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण थोडं धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या गाडीचा अपघात झाला होता. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. त्यामुळेच अपघातानंतर तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवरून हा प्रकार स्वतः शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती.
रुपालीने जानेवारी महिन्यात आपली नवीन मर्सिडीज गाडी घेतली होती. मेहनतीच्या जोरावर घेतलेली ही तिची स्वप्नातील कार काही महिन्यांतच अपघातग्रस्त झाली. व्हिडिओ शेअर करताना तिनं फक्त काही शब्दांत आपली भावना व्यक्त केली होती — “अपघात झाला, वाईट दिवस.” या थोडक्याच शब्दांत तिचा धक्का स्पष्ट जाणवत होता.
आता रुपालीने एका मुलाखतीत या अपघाताविषयी सविस्तर सांगितलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, २९ सप्टेंबर रोजी घोडबंदर रोडवर हा प्रसंग घडला. “एक कंटेनर माझ्या पुढं होता, मी त्याच्या मागे गाडी चालवत होते आणि माझ्या मागेही आणखी एक कंटेनर होता. उतारावर असताना पुढचं कंटेनर अचानक मागे सरकायला लागलं. सुदैवानं तो जास्त वेगात नव्हता, नाहीतर मोठं संकट आलं असतं,” असं ती म्हणाली.
Rupali Bhosle Accident रुपाली पुढे सांगते, “तो अपघात पाहताना मला असं वाटलं की जणू माझ्यावरचं संकट गाडीवर गेलं. गाडीचं नुकसान झालं, पण माझं काहीही बिघडलं नाही, हीच मोठी गोष्ट आहे. मात्र, आपण मेहनतीनं घेतलेल्या गाडीचं असं नुकसान झालं की मनाला खूप लागते.” सध्या तिची गाडी वर्कशॉपमध्ये असून ती पुन्हा दुरुस्त होऊन येईल, असं रुपालीने सांगितलं. या प्रसंगानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिला धीर दिला आणि काळजी व्यक्त केली. रुपालीनेही चाहत्यांचे आभार मानत सांगितलं की, “तो दिवस वाईट होता, पण स्वामींची कृपा असल्याने सर्व काही सुरळीत पार पडलं.”
प्रेमकथेचा फिल्मी ट्विस्ट! मेधा मांजरेकर ठरल्या सुलेखा तळवलकरांच्या लग्नाची सूत्रधार”
रुपाली भोसले ( Rupali Bhosle Accident ) सध्या तिच्या मालिकांबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तिच्या या अपघातानंतर पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की संकट कितीही मोठं असलं, तरी आत्मविश्वास आणि श्रद्धेने त्यावर मात करता येते.









